मुंबई । प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते की, त्यांच्या आवडत्या खेळाडूला शेवटच्या वेळी मैदानावर खेळताना पाहावे आणि त्याला निरोप द्यावा. परंतु हे बर्याचदा असे घडत नाही. उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही खेळाडू या सन्मानापासून वंचित राहतात. 15 ऑगस्ट रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तेव्हांपासून खेळाडूंनी मैदानातून क्रिकेटचा निरोप घ्यावा अशी चर्चा सुरू झाली.
या संदर्भात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने वक्तव्य केले आहे. यामुळे या सर्व खेळाडूंना एकत्रितपणे फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळेल. इरफानने एक भारतीय संघ निवडला आहे. त्यात अंतिम ११ मधील खेळाडूंना फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इरफानच्या संघात भारताचे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत.
इरफानने लिहिले आहे की, “बरेच लोक फेअरवेलचा सामना न खेळताच निवृत्त झालेल्या खेळाडूंबद्दल बोलत आहेत. फेअरवेलचा सामना न खेळताच निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या संघाचा आणि विराटच्या संघाचा एक सामना व्हावा.”
या सामन्यासाठी इरफानने खेळाडूंची निवड केली आहे. त्याने निवडलेल्या निवृत्त खेळाडूंच्या संघात अजूनही बरेचसे खेळाडू तंदुरुस्त आहेत.
यावर्षी जानेवारीत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झालेल्या इरफानच्या मते, “धोनी, रैना, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड सारख्या खेळाडूंसाठी निरोप सामना खेळवण्याची कल्पना वाईट नाही. या खेळाडूंचा सामना भारताच्या विद्यमान संघाशी होईल.”
कोविड -19 च्या साथीमुळे बीसीसीआय अशा प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्याची शक्यता कमी आहे. तरीही जर बीसीसीआयने या सामन्याचे आयोजन केले, तर एक गोष्ट निश्चित आहे की या सामन्यात स्टेडियम प्रेक्षकांनी पूर्ण भरेल. याशिवाय आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना फेयरवेलचा सामना न मिळाल्याबद्दल नाखूश असलेले चाहतेदेखील खूप आनंदित होतील.
Many people are talking about a farewell game for retired players who didn't get a proper send-off from the game. How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team? pic.twitter.com/diUiLXr9XQ
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 22, 2020
इरफान पठाणने निवडलेला संघ-
गौतम गंभीर, विरेंद्र सहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंह, सुरेश रैना, एमएस धोनी, इरफान पठान, अजित आगरकर, झहीर खान, प्रज्ञान ओझा.
महत्त्वाच्या बातम्या-
-तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने रचला धावांचा डोंगर; पाकिस्तान पुन्हा ‘बॅकफूट’वर
-सीपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ‘या’ संघाला अपयश
ट्रेंडिंग लेख-
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर