मुंबई । पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जोस बॅटलरवर खराब यष्टीरक्षणाबद्दल कडाडून टीका केली गेली होती, परंतु 29 वर्षीय खेळाडूने इंग्लंडच्या दुसर्या डावात कठीण वेळी 75 धावा केल्या. शिवाय ख्रिस वोक्ससह सहाव्या विकेटच्या भागीदारीत 139 धावा केल्या. संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. विजयाच्या 277 धावांचा पाठलाग करणार्या इंग्लंडने 117 धावांच्या मोबदल्यात पाच गडी गमाविले होते. तेव्हा त्यांनी ही भागीदारी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या मते, यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर एक ‘परिपूर्ण खेळाडू’ आहे. त्याला नियमितपणे इंग्लंड कसोटी संघात स्थान द्यायला हवे.
वॉर्नने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, ”तो नेहमीच संघात असावा. जोस बटलर एक चांगला आणि विश्वासू यष्टिरक्षक आहे, परंतु कधीकधी, आपले दिवस वाईट असतात आणि तेथील परिस्थिती तितकी सोपी नव्हती. त्याच्या क्षमतेमुळे, विशेषतः फलंदाजीमुळे तो नेहमीच तुमच्या संघात असावा. त्याची विकेटकीपिंगही ठीक आहे, तो शांत राहतो आणि संघाचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत. तो पूर्ण खेळाडूसारखा आहे.”
बटलरच्या फलंदाजीमुळे प्रभावित झालेला वॉर्न म्हणाला, “स्वतः बटलरला आत्मविश्वास होता की तो संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकेल आणि या गोष्टीने मला खूप प्रभावित केले.”
नासिर हुसेन म्हणाले, ”ही लय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. जोस वनडे सामन्याप्रमाणे खेळला. आम्ही आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाहिले आहे, जेव्हा जेव्हा तो असे खेळतो तेव्हा त्याला रोखणे कठीण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज