ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने भारताविरुद्धच्या मालिकेची अॅशेसशी तुलना केली आहे. या व्यतिरिक्त जोश हेजलवुडने ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या सध्याच्या काळातील खेळाडूंच्या संयुक्त कसोटी संघाचीही निवडही केली आहे.
जोश हेजलवुडने ब्ल्यू.आय.एन. बरोबर बोलताना निवडलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मनोरंजक नावे आहेत. त्याने भारताच्या जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि स्वत: ला वेगवान गोलंदाज म्हणून ठेवले आहे. याशिवाय त्याने फिरकीपटूंसाठी नॅथन लायन आणि आर अश्विनची निवड केली आहे.
जोश हेजलवूडचा असा विश्वास आहे की जर कसोटी सामना ऑस्ट्रेलियामध्ये असेल तर तो लायनबरोबर जाईल आणि कसोटी भारतात असेल तर त्याचा पर्याय अश्विन असेल. याशिवाय त्याने सलामी फलंदाजीसाठी भारताचा मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना ठेवले आहे.
स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे या संघात मधल्या फळीतील फलंदाज असतील. सहाव्या स्थानासाठी त्यांनी मार्नस लब्युशेन आणि रोहित शर्माचा विचार केला आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जोश हेजलवुडने आपल्या संघात कोणताही विकेटकीपर ठेवलेला नाही.
यावर्षाच्या शेवटी भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून भारताने इतिहास रचला होता आणि हा पराक्रम पुन्हा करण्यास यावर्षी भारतीय संघ उत्सुक असेल.
या मालिकेबद्दल जोश हेजलवुड म्हणाला की, “आमच्याकडे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर असणार आहेत. मार्नस लब्युचेनसुद्धा चांगली कामगिरी करत आहे. गोलंदाजी गेल्या वेळेसारखीच आहे, पण आता आमच्याकडे अनुभव जास्त आहे. भारतीय गोलंदाजांनी आम्हाला खूप त्रास दिला होता आणि तेही आमच्या घराच्या मैदानांवर, आम्हाला ते आवडला नाही. प्रत्येकजण ही मालिका पाहणार आहे आणि आता ती मालिका अॅशेसच्या पातळीवर पोहोचली आहे. ही दोन्ही संघांसाठी एक अतिशय महत्वाची मालिका ठरणार आहे.”
जोश हेजलवुडचे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय खेळडूंचा संयुक्त कसोटी संघ-
मयंक अग्रवाल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, मार्नस ल्युबुशन/रोहित शर्मा, नॅथन लायन/ आर अश्विन, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज संकटात; या देशाने दौरा केला रद्द
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
२०११च्या विश्वचषकादरम्यान आशिष नेहराला शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने केली होती ‘ही’ मदत
ट्रेंडिंग लेख –
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…
असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज