fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सील बाॅर्डर क्राॅस करुन भाजप खासदार क्रिकेट खेळण्यासाठी हरियाणात

Manoj Tiwari Crosses Sealed Border to Haryana to Play Cricket, AAP Blasts Him

मुंबई । भाजपचे खासदार मनोज तिवारी पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन असतानाही मनोज तिवारी यांनी दिल्लीहून हरियाणात राज्यातील सेनापती गन्नोर येथे एका क्रिकेट अकॅडमीच्या कार्यक्रमास गेले. तिथे गेल्यानंतर  क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या या कृत्यावर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या महामारी विरुद्ध लढत असताना भाजपाचे खासदार हे क्रिकेटचा आनंद लुटत आहेत ही गोष्ट चाहत्यांना रुचली नाही. नेटकऱ्यांनी श्री तिवारी यांना देशाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मनोज तिवारी यांच्या सांगण्यावरून स्थानिक आयोजकांनी त्यांच्यासाठी खास क्रिकेटची जर्सी देखील तयार केली होती. हेल्मेट आणि पॅड बांधून ते मैदानात फलंदाजीसाठी उतरले.

त्यावर स्पष्टीकरण देताना मनोज तिवारी म्हणाले की, आयसीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले. त्याचबरोबर सरकारने सांगितल्याप्रमाणे सोशल डिस्टिंगशन देखील ठेवले होते.

या कार्यक्रमासाठी जाताना मी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेतली होती. हरियाणा सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना या दौऱ्याबाबत आणि कार्यक्रमाबाबत माहिती दिली होती. माझ्या परिचयातील एका व्यक्तीने अकादमी सुरुवात केली आहे. ती पाहण्यासाठी आणि एक फ्रेंडली मॅच साठी तेथे गेलो होतो. मैदानात केवळ वीस ते पंचवीस लोक उपस्थित होते, असेही तिवारी म्हणाले.

 

नेटकऱ्यांच्या मते, या कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठेही सोशल डिस्टन्स दिसून येत नव्हता. एका ट्विटर युजरने लिहिले की, देशाची काळजी सोडून हे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्याकडे हेच काम राहिले होते का? त्यांनी आपल्या मतदार संघात जाऊन जनतेच्या समस्या का जाणून घेत नाहीत? लोकांची मदत करायचे नाही फक्त मौजमजा करत राहायचे. अशा शब्दात मनोज तिवारी यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला.

 

You might also like