नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा)चे ३ अधिकारी आणि ६ डोप नियंत्रण अधिकारी (डीसीओ) १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२०मध्ये खेळाडूंचे नमुने (सँपल) घेण्यासाठी युएईला जाणार आहेत. नाडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडाने १० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या टी२० लीगदरम्यान कमीत कमी ५० खेळाडूंचे नमुने घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी या भारतीय संघाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. NADA Is Planning To Conduct Samples Of 50 Players In IPL 2020
बीसीसीआयचे एक जेष्ठ अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “नाडाचे ९ लोक युएईमध्ये राहणार आहेत. जर त्यांना गरज भासली तर ते युएईमधील राष्ट्रीय अँटी-डोपिंग संघटनेचीही मदत घेतील. नाडाच्या तीनही ठिकाणी प्रत्येकी तीन संघ असतील, ज्यामध्ये १ अधिकारी आणि २ डीसीओंचा समावेश असेल. त्यांच्याव्यतिरिक्त स्थानिक अँटी-डोपिंग संस्थेचे कर्मचारीही प्रत्येक ठिकाणी थांबतील.”
असे असले तरी, नाडाने अजून माहिती दिलेली नाही की, त्यांचा पूर्ण खर्च नाडा स्वत: करणार आहे का? बीसीसीआयला यामध्ये योगदान द्यावे लागले. कारण यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर होत आहे, त्यामुळे नाडाला बीसीसीआयकडून खर्चाची अपेक्षा असू शकते. भारतात भारतीय खेळाडूंचे नमुने एकत्र करणे, त्यांची वाहतूक आणि परिक्षणाचा खर्च सहसा नाडाच करते. हे सर्व करत असताना, नाडाच्या सर्व अधिकाऱ्यांना बीसीसीआयच्या जैव सुरक्षित वातावरणात राहण्यासाठी सांगण्यात येणार आहे.
नाडाने बीसीसीआयला युएईमध्ये ५ डोप नियंत्रण स्टेशन तयार करायला सांगितले आहेत. त्यातील ३ अबु धाबी, शारजाह आणि दुबईत सामन्यांच्या ठिकाणी असतील. तर उर्वरित २ दुबई आणि अबुधाबीमध्ये खेळाडूंच्या सराव क्रेंदाच्या ठिकाणी असतील. नमुन्यांची संख्या जरी मर्यादित असली, तरी बीसीसीआय काही रक्तांचे नमुने एकत्र करण्याची शक्यता आहे. कारण, दुबईतून सर्व नमुन्यांना दोहापर्यंत पाठवायचे असतात. त्यामुळे बीसीसीआयला नमुन्यांची वाहतूक करणे सोपे जाईल. दोहामध्ये नाडाची अधिकृत प्रयोगशाळा आहे.
भारतात कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेता यंदा युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजण्यात आला आहे. युएईतील अबु धाबी, शारजाह आणि दुबई या ३ ठिकाणी सामने पार पडणार आहेत. २१-२२ ऑगस्टला युएईला जाण्यासाठी रवाना झालेल्या सर्व संघातील भारतीय खेळाडूंना युएईत ६ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या सगळ्या प्रशिक्षकांना थेट जगाच्या यात्रेवर पाठवा, दिग्गज कडाडला
एकदाही शून्यावर बाद न होता आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा धुरंदर
ब्रावोने रचला इतिहास! बनला असा कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
ट्रेंडिंग लेख –
जगातील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटरबद्दल १० माहित नसलेल्या गोष्टी
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान या ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर असेल आयपीएल फ्रेंचायझीचीं नजर
मुंबई इंडियन्स आणि पाचवे आयपीएल विजेतेपद यांच्यात अडथळा ठरु शकतात ही ३ कारणे