fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

Now James Anderson want to Challenge Virat Kohli In India

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

लंडन। इंग्लंड संघाचा विक्रमवीर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान आपल्या ६०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करत तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांना बाद करण्याचे आव्हान त्याला नेहमीच आवडते. पुढील वर्षी जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी तो चांगल्याप्रकारे तयार झाला आहे.

‘टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्ट’वर बोलताना अँडरसनने म्हटले, “विराटसारख्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते. हा खूप अटीतटीचा सामना असेल. परंतु यामध्ये आनंद मिळतो. तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंना बाद करायचे असते.”

ज्यावेळी २०१४मध्ये भारतीय संघ इंग्लंंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी अँडरसनने ४ वेळा विराटला बाद केले होते.

विराटने त्यादरम्यान आपल्या १० डावांमध्ये केवळ १३४ धावाच केल्या होत्या. परंतु २०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यात विराट एका वेगळ्या अंदाजात दिसला. त्यावेळी तो ५९३ धावा करत अव्वल स्थानावर होता. त्यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता.

पुढे बोलताना म्हटले, “२०१४ मध्ये काही अंशी यश मिळाले होते. परंतु त्यानंतर २०१८ मध्ये विराट वेगळ्याच अंदाजात दिसला आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.” असे विराटबद्दल बोलताना ३८ वर्षीय अँडरसनने पुढे म्हटले.

२०१८ मध्ये विराटच्या फलंदाजीत कोणते बदल दिसले?, असा प्रश्न विचारला असता अँडरसन म्हणाला, “तो २०१८मध्ये चेंडू योग्य प्रकारे सोडत होता. २०१४ मध्ये जेव्हा मी आऊट स्विंगर फेकायचो, तेव्हा तो या चेंडूवरही शॉट लगावण्याचा प्रयत्न करायचा आणि बॅटची कड लागून बाद व्हायचा. परंतु २०१८मध्ये तो संयमाने खेळत होता.”

महत्त्वाच्या बातम्या-

-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?

-जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना

-सुरेश रैनाला सीएसकेची टीम करत आहे मिस; संघ सहकाऱ्याने दिली प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

-टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून

-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा


Previous Post

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

Next Post

मोईन अलीला बाद करण्यासाठी रिझवानने वापरली ही आयडीया; म्हणाला, त्याला उर्दू येते…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

मोईन अलीला बाद करण्यासाठी रिझवानने वापरली ही आयडीया; म्हणाला, त्याला उर्दू येते...

आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी

सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.