नवी दिल्ली। पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज समी अस्लमने मोठा निर्णय घेतला आहे. तो आपला देश सोडून अमेरिकेला जाणार आहे. अस्लमने अमेरिकेतील मोठ्या टी२० लीगची ऑफर स्विकारल्यानंतर पाकिस्तान सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
समी अस्लमचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. कारण तो सध्या केवळ २४ वर्षांचा आहे. आणि इतक्या कमी वयात त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन करण्याची आशा सोडली आहे.
अस्लमला अमेरिकेचे नागरिकत्व घ्यायचे आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याला पुढे जाऊन अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळायचे आहे.
अस्लमने २०१५ साली पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १३ कसोटी सामने आणि ४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत ३१.५८ च्या सरासरीने ७५८ धावा केल्या आहेत. सोबतच वनडेत त्याने १९.५० च्या सरासरीने ४५ धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५९४ धावा केल्या आहेत. यात त्याने १४ शतके ठोकली आहेत. सोबतच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ३७२८ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ शतके ठोकली आहेत.
अस्लम २०१६ पासून वनडे आणि २०१७ पासून कसोटी संघातून बाहेर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“होय, गांगुलीचा ‘तो’ झेल शंकास्पद होता”, इंजमामची २१ वर्षांनंतर कबुली
‘हताश होऊ नको, मेहनत कर’, ‘या’ खेळाडूला सचिनने पाठवला होता खास संदेश