मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग 2020 मध्ये (सीपीएल) भारतीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे देखील खेळत आहे. 48 वर्षीय प्रवीण या टी -20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांने बीसीसीआय अंतर्गत असलेल्या सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली.
तांबे सध्या ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे, ज्यांनी या स्पर्धेत सलग आठवा विजय नोंदविला आहे. बुधवारी (2 सप्टेंबर) सेंट किट्स अँड नेव्हिस पैट्रियट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तांबेने एक झेल घेतला जो व्हायरल झाला. या कॅचचा व्हिडिओ सीपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केला गेला आहे.
वयाच्या 48 व्या वर्षी तांबेने ‘फ्लाइंग कॅच’ पकडला. तो झेल अविश्वसनीय होता. या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने 59 धावांनी मोठा विजय मिळविला. खैरी पियरेच्या चेंडूंवर तांबेने एविन लुइसच झेल पकडला. तो झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तांबे याने हा झेल घेत हे सिद्ध केले की वय फक्त एक संख्या आहे आणि आपल्या चपळाईशी त्याचा काही संबंध नाही.
प्रवीण तांबे याच्या या झेलाची सोशल मीडियावरही चर्चा आहे. सीपीएलने झेलाला ‘गुगली मॅजिक मोमेंट ऑफ द गेम’ म्हटले.
48 and flying! Pravin Tambe takes a screamer to take the Googly Magic Moment of the game! What a catch! #CPL20 #CricketPlayedLouder #TKRvSKP pic.twitter.com/xsJC49T2Zi
— CPL T20 (@CPL) September 2, 2020
तांबेने एकूण 33 आयपीएल सामने खेळले असून यावेळी त्याने एकूण 28 विकेट्स घेतल्या आहेत. तांबेने 2016 पासून आयपीएलचा कोणताही सामना खेळलेला नाही. 2013 मध्ये, तो वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल सामन्यात खेळला. यंदाच्या आयपीएलसाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांच्या लिलावात विकत घेतले होते.
परंतू त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) परवानगी न घेता दुबई आणि शारजाहमधील टी 10 लीगमध्ये भाग घेतला, यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यास त्याच्यावर बंदी घातली गेली. बीसीसीआयच्या धोरणानुसार कोणताही बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेटपटू निवृत्तीची अधिकृत घोषणा न करता परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…
मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार
ट्रेंडिंग लेख –
वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज
मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू