आयपीएल २०१३ या मोसमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या मोसमात स्पॉट फिक्सिंगचा खुलासा झाला होता आणि राजस्थान रॉयल्सचे ३ मोठे खेळाडू एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदीला यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. तरीही आता श्रीसंतवर लागलेली ७ वर्षांची बंदी आता हटणार आहे तसेच तो पुढच्या महिन्यापासून मैदानावर पुनरागमनही करणार आहे. श्रीसंतबाबत राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू आणि २०१२ मध्ये भारताला १९ वर्षांखालील विश्वचषकात विजय मिळवून देणारा फिरकीपटू हरमीत सिंगने मोठा खुलासा केला आहे.
श्रीसंतच्या खोलीत राहायच्या मुली
हरमीतने क्रिकबझला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुलासा केला आहे की, जेव्हा तो राजस्थान रॉयल्स संघात सामील होता, तेव्हा श्रीसंत त्याला नेहमीच जवळ ठेवायचा. त्याची खोली श्रीसंतच्या बाजूलाच असायची. हरमीतने सांगितले की, श्रीसंत रात्रभर पार्टी करत असायचा आणि त्याच्या खोलीत मुलीही असायच्या.
“त्यावेळी केवळ २ कसोटी खेळाडू राहुल द्रविड आणि श्रीसंत त्या संघात होते आणि दोघेही माझ्यावर प्रेम करायचे. शेवटी त्यांच्याबरोबर राहायला कोणाला आवडणार नाही. श्रीसंतसाठी मी अगदी जवळचा व्यक्ती होतो. मी नेहमीच माझी खोली त्याच्या शेजारी ठेवावी अशी त्याची इच्छा होती जेणेकरून जेव्हा तो मेजवानी करतो, तेव्हा इतर कुणालाही त्रास होणार नाही,” असे तो म्हणाला.
२०१३ साली जेव्हा श्रीसंतला अटक झाली, तेव्हा व्हिडिओ फुटेजमध्ये दाखविण्यात आले होते की श्रीसंतच्या खोलीत महिला जात होत्या. हरमीतने याबाबत मोठा खुलासा करत म्हटले, “श्रीसंतच्या खोलीत कोण येत आहे, याबाबत माझा काहीही संबंध नव्हता. जेव्हा मी सकाळी ६ किंवा ७ वाजता जिमला जाण्यासाठी उठायचो, तेव्हा श्रीसंत पार्टी करत असायचा. मला कधीही संशयास्पद वाटले नाही कारण अटक झालेल्या जीजू जनार्धनने आम्हाला सांगितले की, तो श्रीसंतचा भाऊ आहे. त्यामुळे अशी शंका कोणाला वाटेल? तो नेहमीच श्रीसंतबरोबर होता आणि त्याच्याबरोबर मुलीही असत. श्रीसंत हुशार आणि तरूण होता आणि त्याच्याबरोबर जयपूरमध्ये मुली होत्या, म्हणून मी कधीच त्याच्यावर संशय घेतला नाही.”
श्रीसंतचे बिल २-३ लाख रुपये यायचे
हरमीतने (Harmeet Singh) मुलाखतीत पुढे बोलताना खुलासा केला की, श्रीसंत इतक्या पार्ट्या करायचा की त्याच्या खोलीचे बिल २ ते ३ लाख रुपये यायचे. तो म्हणाला, “जेव्हाही आम्ही कुठेतरी २ किंवा ३ दिवस थांबायचो, तेव्हा २ ते ३ लाख रुपयांचे बिल यायचे. श्रीसंत आपली दारू स्वत: विकत घ्यायचा, तो लोकांंना दारू भेट म्हणून द्यायचा. मला वाटले की तो श्रीमंत आहे कारण तो २ विश्वविजेत्या संघाचा भाग होता आणि तो अनेक आयपीएलमध्येही खेळला होता. आम्हाला फिक्सिंगबाबत कधीही संशय आला नाही.”
क्रिकबझने श्रीसंतला (S Sreesanth) जेव्हा हरमीतच्या दाव्यावर प्रश्न विचारले, तेव्हा तो म्हणाला की, हरमीत त्याच्या शेजारीच राहायचा. श्रीसंतने म्हटले की, हरमीत खूप मेहनती क्रिकेटपटू होता, मी नेहमीच अशा क्रिकेटपटूंचे समर्थन करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’
-कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी
-पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी
ट्रेंडिंग लेख-
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी