नॅशनल टी२० कप स्पर्धेत शनिवारी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने टी२० क्रिकेटमधील एक खास विक्रम केला. त्याने खैबर पख्तूनवाला संघाकडून खेळताना बलुचिस्तान संघाविरुद्ध ४४ चेंडूत ७४ धावा करण्याचा विक्रम केला. याचबरोबर त्याने टी२० क्रिकेटमधील १० हजार धावा करण्याचा पराक्रमही केला.
त्याने सर्व प्रकारच्या व्यावसायित टी२० स्पर्धांमध्ये मिळून ३९५ सामन्यात ३७.४१च्या सरासरीने १० हजार २७ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. आशिया खंडात मलिक सोडून दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला असा पराक्रम करता आला नाही.
यापुर्वी ख्रिस गेलने टी२० क्रिकेटमध्ये ४०४ सामन्यात ३८.२०च्या सरासरीने १३२९६ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड असून त्याने ५१८ सामन्यात ३१.५१च्या सरासरीने १०३७० धावा केल्या आहेत.
भारताकडून सर्वाधिक टी२० धावा करण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. तो ९०३३ धावांसह या यादीत ७व्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा ८८५३ धावांसह ८व्या स्थानावर आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१३२९६- ख्रिस गेल
१०३७०- कायरन पोलार्ड
१००२७- शोएब मलिक
९९२२- ब्रेंडन मॅक्क्युलम
९५०३- डेविड वॉर्नर
९१६१- ऍरॉन फिंच
९०३३- विराट कोहली
८८५३- रोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
”केवळ ‘या’ कारणामुळे आम्ही सामना गमावला” दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथने दिली प्रतिक्रिया
रिषभ, अय्यर धावबाद झाले आणि दिल्लीने नोंदवला ‘हा’ नकोसा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून
शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू