fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन

August 31, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


मुंबई । गतवर्षी दिल्ली कॅपिटल संघाने सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रथमच आयपीएल प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. आता यावेळी संघाला अधिक चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कर्णधार म्हणून सर्वात महत्त्वाची स्पर्धा असल्याचे सांगितले. त्याच्या मते, संघातील सर्व साथीदारांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. कारण एखाद्या खेळाडूच्या कामगिरीने काही फरक पडणार नाही.

श्रेयस अय्यर आयपीएल टी-20 डॉट कॉमला सांगितले की, “मागील हंगामापेक्षा हा हंगाम नक्कीच खूप वेगळा आहे, परंतु आव्हाने मला रोमांचित करतात. कर्णधार म्हणून नक्कीच ही माझी सर्वात महत्वाची स्पर्धा आहे, कारण परिस्थिती खूप वेगळी आहे. हे अगदी भिन्न असेल, यासाठी एका वेळी एका दिवसाबद्दल विचार करणे सर्वात महत्वाचे आहे.”

तो म्हणाला, ”आम्हाला प्रत्येक टप्प्यात काय करावे आणि काय करू नये हे सांगितले गेले आहे.  कोव्हिड १९ संदर्भात नियमांचे पालन अनुसरण करणे, हे महत्त्वाचे ठरेल. तसेच एक विजेता संघ होण्यासाठी सर्व योग्य गोष्टी करणे आवश्यक आहे. पण आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे आणि निकाल सतत खालीवर येत राहतात,” असे अय्यरनी सांगितले.

कोविड -१९ साथीच्या आजारामुळे जगातील सर्वात मोठ्या टी -20 लीगचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत आहे.

“एका खेळाडूच्या बळावर आयपीएलसारखी स्पर्धा जिंकता येत नाही.  यासाठी संपूर्ण संघाला एकता दाखविणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात आमच्यासाठी एक गोष्ट अशी होती की प्रत्येक प्रसंगी वेगवेगळे खेळाडू पुढे आले आणि ते आमच्या यशामध्ये महत्वाचे होते. या हे वर्षीही महत्त्वाचे ठरणार आहे, केवळ एका खेळाडूची सातत्यपूर्ण कामगिरीच नव्हे तर अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे फरक पडेल,” असे श्रेयस अय्यरने सांगितले.

आयपीएल 2020 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ

श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, मोहित शर्मा, ललिता यादव, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, मार्कस स्टोयनिस, ऋषभ पंत, एलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमायर आणि तुषार देशपांडे

महत्त्वाच्या बातम्या –

‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता

असा साजरा केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईचा ८३ वा वाढदिवस

टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा 

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार


Previous Post

‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता

Next Post

दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

January 27, 2021
Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/RCBTweets

दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण

Photo Courtesy: Twitter/ CPL

निकोलस पूरनने ठोकले टी 20 क्रिकेटमध्ये पहिले वादळी शतक; गयाना वॉरियर्सने सेंट किट्सला चारली धूळ

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

बीसीसीआयला खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा; सोशल मीडियावर चाहत्यांची टीका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.