आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ पूर्वीपेक्षा भक्कम दिसत आहे. दिल्लीच्या संघातील सर्व खेळाडू आपल्या नावाप्रमाणे खेळले तर यावर्षी दिल्लीला विजेतेपद मिळवणे अवघड जाणार नाही. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय यावेळी दिल्ली संघात दिसत आहे.
२०२० आयपीएल साठी पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे सारखे खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या वरच्या फळीत आहेत. त्यांच्याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत हे तरुण भारतीय व शिमरन हेटमायर व ॲलेक्स केरी हे मध्यफळीची जबाबदारी सांभाळतील. रविचंद्रन अश्विन व अमित मिश्रा ही फिरकी जोडगोळी संघात आहे. तसेच, कगिसो रबाडा व इशांत शर्मा वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
दिल्ली संघाबरोबर, बर्याच वेळा असे झाले आहे की, टी२० क्रिकेटचे जागतिक दर्जाचे खेळाडू या संघात येऊन वाईटरित्या फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या समावेशाचा फायदा दिल्ली संघाला मिळाला नाही. या लेखात अशा तीन दिग्गजांविषयी जाणून घेऊया.
१) कॉलीन मुन्रो
टी२० क्रिकेटमध्ये मुन्रो किती मोठा खेळाडू आहे हे सर्व क्रिकेटप्रेमी जाणतात. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याच्या नावे तीन शतके आहेत. सोबतच तो अनेक दिवस टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी होता. इतकी मोठी प्रसिद्धी घेऊन आलेल्या मुन्रोला दिल्ली कॅपिटल्ससाठी मात्र, भरीव कामगिरी करता आली नाही. मन्रोने दिल्लीसाठी ९ सामन्यात अवघ्या १४७ धावा काढल्या. ज्या त्याच्या मानाने अत्यल्प होत्या.
२) कार्लोस ब्रेथवेट
२०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, इंग्लंडच्या बेन स्टोक्सला, सलग चार षटकार खेचत वेस्ट इंडिजला विजेता बनवणारा ब्रेथवेट देखील दिल्लीसाठी फ्लॉप ठरला आहे. वेस्ट इंडीजचा टी२० कर्णधार राहिलेल्या ब्रेथवेटने १० सामन्यात अवघ्या ९५ धावांचे योगदान दिल्लीसाठी दिले. २०१६ च्या संपूर्ण आयपीएल हंगामात तो आपल्या नावाप्रमाणे खेळ करू शकला नाही.
३) आंद्रे रसेल
सध्या टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असलेला आंद्रे रसेल २०१३ मध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करत होता. गेली काही वर्ष कोलकाता नाइट रायडर्सचा अव्वल क्रमांकाचा मॅच विनर असलेल्या रसेलचे दिल्ली सोबतचे आयपीएल सत्र अत्यंत निराशाजनक राहिले होते. दिल्लीसाठी ७ आयपीएल सामने खेळताना त्याने अवघ्या ५८ धावा व १ बळी मिळविला होता. अशा खराब कामगिरीमुळे त्याला दिल्ली संघाने बाहेर काढले होते.
ट्रेंडिंग लेख –
५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी
राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण
जगातील ५ असे उपकर्णधार, ज्यांना कर्णधार केले असते तर झाले असते महान कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन विराटच्या बॅटची काळजी घेणारा देतोय मृत्यूशी देतोय झुंज, काही क्रिकेटरकडून तर…
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?
जेव्हा घनिष्ठ मित्र असलेल्या रैनावरच चढला होता धोनीचा पारा; या माजी खेळाडूने सांगितला किस्सा