आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठीची पात्रता पद्धती आणि वेळापत्रक सोमवारी (१४ डिसेंबर) जाहीर केले आहे. यामध्ये १५ जागांसाठी तब्बल ८६ संघांमध्ये सामने होतील. हे सामने १३ महिने सुरू असतील. तसेच यामध्ये तब्बल २२५ सामने खेळले जाणार आहेत.
पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार्या चार-चरणांच्या पात्रता प्रक्रियेद्वारे या १५ ठिकाणांचा निर्णय घेतला जाईल. कोव्हिड-१९ साथीच्या रोगामुळे, पाच क्षेत्रांतील ११ प्रादेशिक पात्रता स्पर्धा २०२१ मध्ये निश्चित करण्यात आल्या आहेत. या विश्वचषकाचे आयोजन २०२० मध्ये होणार होते, परंतु आता ही स्पर्धा २०२२ मध्ये खेळला जाईल.
फिनलँड पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत खेळणार
फिनलँड पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत खेळणार आहे. सोबतच जपानही पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाचे आयोजन करेल. ६७ सहयोगी सदस्य यामध्ये भाग घेतली. आयसीसी इव्हेंट्सचे प्रमुख ख्रिस टेटले म्हणाले की, हंगेरी, रोमानिया आणि सर्बिया हे तीन संघ प्रथमच मैदानात उतरत आहेत. या स्पर्धेमुळे संघांना रँकिंगमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील सर्व सामने कोव्हिड-१९ च्या नियमाअंतर्गत खेळले जातील.
२०२१ टी२० विश्वचषकात १६ संघ घेणार भाग
मूळ २०२० च्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले १६ संघ आता २०२१च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतामध्ये खेळतील. त्या स्पर्धेत सहभागी संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामीबिया, नेदरलँड्स, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने घेतली पुजाराची धास्ती; म्हणाला…