मागील दोन आठवडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टोकियो ऑलिंपिक्स २०२० या खेळांच्या महाकुंभाचा रविवारी (८ ऑगस्ट) समारोप झाला. या दरम्यान अनेक देशांनी पहिल्यांदाच सुवर्ण पदकावर नाव कोरले, तर अनेक खेळाडूंनी सलग आपले अव्वल स्थान कायम राखले. विशेष म्हणजे सर्वाधिक ऑलिंपिक पदकं पटकावण्याचा मान अमेरिकेने मिळवला. दुसरीकडे द्वितीय क्रमांक चीनने, तर यजमान जपानने तिसरे स्थान पटकावले. याव्यतिरिक्त भारताला पदकांच्या क्रमवारीत खूपच खालचे स्थान मिळाले.
या ऑलिंपिकमध्ये अमेरिकेने एकूण ३९ सुवर्ण, ४१ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांसह एकूण ११३ पदकं मिळवली. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनने २८ सुवर्ण, ३२ रौप्य आणि १८ कांस्य पदकं आपल्या नावावर केली. दुसरीकडे जपानच्या खात्यात २७ सुवर्ण, १४ रौप्य आणि १७ कांस्य पदकं आहेत. याव्यतिरिक्त भारताच्या नावावर १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकं आहेत. (Tokyo Olympics 2020 Total Medal USA Dominate Medal Count India Finished At 48th Spot With 7 Medals)
A special day for @Neeraj_Chopra1 and a special day for @WeAreTeamIndia! ????
It's a first gold medal at #Tokyo2020 and a first ever athletics gold for #IND pic.twitter.com/qF4BIXSK93
— The Olympic Games (@Olympics) August 7, 2021
विशेष म्हणजे एकूण ६३ देशांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नीरज तुसी ग्रेट हो! भारताच्या भालाफेकपटूने मिल्खा सिंग यांना ‘गोल्ड’ मेडल केले समर्पित
-राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले; नीरज चोप्रावरील ‘त्या’ ट्वीटने पेटला नवा वाद