जगप्रसिद्ध टी२० लीग आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात झाली आहे. या हंगामातील आतापर्यंत १० सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंनी आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखामध्ये आपण आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधील अव्वल १० सर्वोच्च खेळींबद्दल जाणून घेणार आहोत.
१. केएल राहुल- १३२* धावा (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
आयपीएल २०२० च्या सहाव्या सामन्यात केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळताना ६९ चेंडूत सर्वाधिक नाबाद १३२ धावांची खेळी केली होती. त्यात ७ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. राहुलच्या या खेळीमुळे पंजाबने बेंगलोरवर ९७ धावांनी विजय मिळवला.
२. मयंक अगरवाल- १०६ धावा (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध राजस्थान रॉयल्स
आयपीएल २०२०च्या हंगामातील नववा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात पंजाबकडून खेळताना मयंक अगरवालने ५० चेंडूत सर्वाधिक १०६ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये ७ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. शतकी खेळी करूनही मयंकला पंजाबला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थान संघाने हा सामना ४ विकेट्सने जिंकला.
३. इशान किशन- ९९ धावा (मुंबई इंडियन्स) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
आयपीएल २०२०चा दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईकडून खेळताना इशान किशनने ५८ चेंडूत तडाखेबंद खेळी करत सर्वाधिक ९९ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि तब्बल ९ षटकार ठोकले. असे असले तरी त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. हा सामना बेंगलोर संघाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
४. मयंक अगरवाल- ८९ धावा (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
प्रतिष्ठित लीग आयपीएल २०२०चा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात पंजाबकडून खेळताना मयंक अगरवालने ६० चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ८९ धावांची अर्धशतकी खेळी केली. हा या हंगामातील बरोबरीत सुटलेला पहिलाच सामना होता. हा सामना दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
५. संजू सॅमसन- ८५ धावा (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
आयपीएल २०२०च्या हंगामातील नववा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानचा शिलेदार संजू सॅमसनने दमदार फटकेबाजी करत ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. त्याने यादरम्यान ४ चौकार आणि ७ षटकार ठोकले. सॅमसनच्या या योगदानामुळे राजस्थान संघाने हा सामना ४ विकेट्सने जिंकला.
६. रोहित शर्मा- ८० धावा (मुंबई इंडियन्स) कोलकाता नाईट रायडर्स
या आयपीएल हंगामातील पाचव्या सामन्यात रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ५४ चेंडूत सर्वाधिक ८० धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. रोहितच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाने हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला.
७. संजू सॅमसन- ७४ धावा (राजस्थान रॉयल्स) चेन्नई सुपर किंग्स
आयपीएल २०२० हंगामातील चौथा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानकडून खेळताना संजू सॅमसनने ३२ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची खेळी केली. त्यात केवळ १ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा समावेश आहे. सॅमसनच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने आपली धावसंख्या २०० च्या पार केली होती. या धावांचे आव्हान चेन्नईला पूर्ण करता न आल्यामुळे त्यांना १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा हा हंगामातील पहिलाच विजय होता.
८. फाफ डू प्लेसिस- ७२ धावा (चेन्नई सुपर किंग्स) राजस्थान रॉयल्स
आयपीएल २०२० हंगामातील चौथा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात राजस्थान संघाने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डू प्लेसिसने ३७ चेंडूत ७२ धावा कुटल्या. त्यात १ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. डू प्लेसिसच्या अर्धशतकी खेळीनेही चेन्नईला विजय मिळवता आला नाही.
९. अंबाती रायडू- ७१ धावा (चेन्नई सुपर किंग्स) मुंबई इंडियन्स
आयपीएल २०२० चा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईकडून खेळताना अंबाती रायडूने जबरदस्त खेळी करत ४८ चेंडूत ७१ धावा केल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. रायडूच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने हंगामातील पहिलाच विजय आपल्या खिशात घातला होता.
१०. शुबमन गिल- ७०* धावा (कोलकाता नाईट रायडर्स) सनरायझर्स हैदराबाद
आयपीएल २०२० चा आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद संघात झाला. या सामन्यात हैदराबाद संघाच्या १४२ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस आलेल्या कोलकाता संघाकडून शुबमन गिलने सलामीला येत ६२ चेंडूत नाबाद ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात २ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे.
आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज
१३२* धावा- केएल राहुल (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१०६ धावा- मयंक अगरवाल (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध राजस्थान रॉयल्स
९९ धावा- इशान किशन (मुंबई इंडियन्स) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
८९ धावा- मयंक अगरवाल (किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
८५ धावा- संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
८० धावा- रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) कोलकाता नाईट रायडर्स
७४ धावा- संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) चेन्नई सुपर किंग्स
७२ धावा- फाफ डू प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्स) राजस्थान रॉयल्स
७१ धावा- अंबाती रायडू (चेन्नई सुपर किंग्स) मुंबई इंडियन्स
७०* धावा- शुबमन गिल (कोलकाता नाईट रायडर्स) सनरायझर्स हैदराबाद