श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या लंका प्रीमियर लीगच्या मार्गातील अडथळे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. स्पर्धा सुरू व्हायला अवघे आठ दिवस शिल्लक असताना आयोजकांना मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज टी२० फलंदाज ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल याने वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल लंका प्रीमियर लीगमध्ये कँडी टस्कर्स संघाकडून खेळणार होता.
संघ व्यवस्थापनाने दिली माहिती
बुधवारी (१८ नोव्हेंबर) कँडी फ्रँचायझीने एक निवेदन सार्वजनिक केले. संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या निवेदनात फ्रँचायझीने म्हटले आहे की, “ख्रिस गेल वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेत आहे. आम्ही गेलचा पर्याय अद्याप जाहीर केला नाही.”
ख्रिस गेल नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला होता. त्याने सात सामन्यात पंजाबचे प्रतिनिधित्व करताना ४ अर्धशतकांसह २८८ धावा कुटल्या होत्या.
इरफान पठाणच्या संघात होता समावेश
कँडी टस्कर्स संघात गेल व्यतिरिक्त भारताचे माजी खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल, श्रीलंकेचे कुसल परेरा, कुसल मेंडीस आणि नुवान प्रदीप हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली आहे माघार
गेलपूर्वी पाकिस्तानचा सरफराज अहमद, वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर, इंग्लंडचा लियाम प्लंकेट या प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेची घोषणा झाली, तेव्हापासून तीन वेळा स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता स्पर्धेला २७ नोव्हेंबरपासून हंबनटोटा येथे सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
“सांगा किती राशिद?”, राशिद खानने चाहत्यांना टाकलं कोड्यात
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी