fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा

Wheel Chair Cricketers Need BCCI Chief Sourav Ganguly Help

August 6, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

अनेकांना असे वाटते की, जर एकदा भारताकडून क्रिकेट खेळायची संधी मिळाली. तर, त्या क्रिकेटपटूचे पूर्ण आयुष्य बदलते. पण, भारतीय संघाची जर्सी घालणारा प्रत्येक क्रिकेटपटू नशीबवान नसतो. विशेषत अपंग क्रिकेटपटू, ज्यांना अपेक्षा आहे की भारतीय क्रिकेट बोर्ड त्यांना आसरा देईल. Wheel Chair Cricketers Need BCCI Chief Sourav Ganguly Help

भारताचे यष्टीरक्षक फलंदाज निर्मल लिंग ढिल्लो हे पंजाबच्या मोगा येथे दूध विकून दिवस काढत आहेत. तर, संतोष रंजागणे हे कोल्हापूरमध्ये दुचाकी वाहनांची दुरुस्ती करतात. तसेच, फलंदाज पोशन ध्रुव हे रायपुरमधील एका गावात वेल्डिंग दुकानात काम करतात. परंतु, या क्रिकेटपटूंना कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शेतात दिवस-रात्र मजदूरी करुन आपले पोट भरावे लागत आहे. तिथे त्यांना दिवसाला फक्त १५० रुपये मिळतात. या तिन्ही क्रिकेटपटूंनी नुकत्याच राष्ट्रीय संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पण, दिव्यांग क्रिकेटपटूंची जबाबदारी बीसीसीआयवर नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार बोर्डाने शारीरिकरित्या अपंग असणाऱ्या क्रिकेटपटूंच्या विकासासाठी एक समिती निर्माण करायला पाहिजे, पण अद्यापही त्याचे काम झालेले नाही. भारताच्या व्हिलचेअर संघाचे कर्णधार सोमजीत सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय व्हिलचेअर क्रिकेट संघाच्या सीईओशी यासंदर्भात बोलणी केली होती. पण, अपंग क्रिकेपटूंसाठी धोरण आखण्यासंदर्भात आता कसलीही चर्चा होताना दिसत नाही. गांगुलीने आम्हाला मदत करण्याचे वचन दिले होते. त्याला भारतीय व्हिलचेअर क्रिकेटविषयी जास्त माहिती नव्हती. पण, आमच्या प्रदर्शनाविषयी ऐकून तो दंग झाला होता.”

सोमजीतने सुरुवातीला उत्तर प्रदेश व्हिलचेअर क्रिकेट संघ आणि नंतर स्क्वाड्रन लीडर अभय प्रताप सिंग यांच्यासोबत मिळून राष्ट्रीय संघ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोमजीत हे हवाईदलाचे माजी फायटर पायलट होते. अपंग क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, बीसीसीआयने ज्याप्रकारे महिला क्रिकेटचा विकास केला आहे. त्याप्रकारे त्यांनी आम्हालाही मदत करायला हवी. बीसीसीआयकडून मान्यता न मिळाल्यामुळे राज्य स्तरावर अनेक संघ निर्माण झाले आहेत. त्यामुळे व्हिलचेअर क्रिकेटपटूंना खेळात टिकून राहण्यासाठी स्वत: खर्च करावा लागत आहे.

संतोष रंजागणे म्हणाले की, “आम्हाला नेपाळ दौऱ्यावर जाण्यासाठी १५ हजार रुपये द्यावे लागले होते. त्यामुळे मला खुप वाईट वाटले होते. पण, नंतर मी राष्ट्रीय संघाशी जुळलो आणि तेव्हापासून ते आमची काळजी घेत आहेत. राष्ट्रीय संघातील अपंग क्रिकेटपटूंना राज्य सरकारकडून एक हजार रुपये पगार मिळतो.”

बांग्लादेश आणि नेपाळविरुद्ध खेळलेल्या निर्मल सिंग यांनी म्हटले की, “मला फेसबुकद्वारे व्हिलचेअर क्रिकेटविषयी कळाले. मी ट्रायल दिले आणि नंतर पंजाब आणि भारतीय संघात माझी निवड झाली. मी काय करु? मला माझ्या आईला सांभाळायचे आहे. म्हणून मी दूध विकून महिन्याला ४००० रुपये कमवायचो. माझा लहान भाऊ मजदूरी करायचा. पण आता लॉकडाऊनमुळे आमचे जगणे कठीण झाले आहे.”

एक बीसीसीआय अधिकारी म्हणाले की, “आता बोर्डाकडे कोणतीही उपसमिती उपलब्ध नाही. अपंग क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयमध्ये एक उपसमिती असेल. पण त्यासाठी वेळ लागले. बीसीसीआयने घटनात्मक सुधारासाठी उच्च न्यायालयात अपील केले आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन

ट्रेंडिंग लेख –

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप


Previous Post

गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर

Next Post

आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

आयपीएल २०२० - या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर...

आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू...

भारताचा हा खेळाडू म्हणतोय, 'त्यावेळी मला वाटले मी माझ्या देशाचा विश्वासघात केलाय'

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.