२०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज (२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे. पूनम यादव आपला ३० वा वाढदिवस आज साजरा करत असून दीप्ती शर्मा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
दीप्ती शर्मा:
२४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचा जन्म हा सहारणपूर, उत्तरप्रदेश मधील असून तिने भारताकडून आजपर्यंत १ कसोटी, ६१ वनडे आणि ५४ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने १५४१ धावा केल्या असून ६८ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात ४७० धावा आणि ५६ बळी घेतले आहेत.
याबरोबरच महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने आयर्लंड विरुद्ध २०१७ मध्ये वनडेत १८८ धावा केल्या होत्या. तसेच यावेळी तिने पुनम राऊत बरोबर पहिल्या विकेटसाठी ३२० धावांची भागादीरी केली होती. महिला वनडेमधील कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च धावांची भागीदारी आहे.
She holds the record for the highest score by an Indian woman in ODIs, her 188 v Ireland in Potchefstroom part of a world record 320-run partnership with Punam Raut!
Happy 21st birthday Deepti Sharma! pic.twitter.com/OWFxS39CQd
— ICC (@ICC) August 24, 2018
पूनम यादव:
३० वर्षीय फिरकी गोलंदाज पूनम यादवचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेशचा असून तिने भारताकडून १ कसोटी, ५२ वनडे आणि ७१ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने ९२ धावा केल्या असून ७५ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात १३ धावा आणि ९८ बळी घेतले आहेत.
https://twitter.com/ICC/status/1430015171926401027?s=20
तसेच ती महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी भारतीय गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड! ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या मार्गावर, तोडू शकतो कपिल देव यांचा ‘मोठा’ रेकॉर्ड
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती