मुंबई । 2004 मध्ये भारत ‘अ’, केनिया ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ यांच्यात तिरंगी मालिका खेळली गेली. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी ही मालिका खूप महत्वाची ठरली होती. या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे राष्ट्रीय संघाची दारे त्याच्यासाठी उघडली गेली होती. या मालिकेत त्याने पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध दोन शतके ठोकली होती. तसेच या मालिकेत धोनी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या कामगिरीमुळे ही मालिका जिंकण्यात भारत यशस्वी झाला होता.
जेव्हा एमएस धोनी पाकिस्तानला गेला तेव्हा त्याने आपल्या फलंदाजी शैलीने लोकांना प्रभावित केले होते. तथापि, या मालिकेतील सामन्यादरम्यान धोनीने असे काहीतरी केले, ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूची भारतीय मुलीबरोबरची लव्ह स्टोरी सुरू होण्यापूर्वीच संपली.
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात सामना खेळला जात होता. धोनी फलंदाजी करत असताना एक पाकिस्तानी खेळाडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. हा खेळाडू सामना पहायला आलेल्या भारतीय मुलीच्या प्रेमात पडला. याच दरम्यान दोघांनीही भेटीचे नियोजन केले होते. पण त्यांची ही भेट होऊ शकली नाही.
या सामन्यात धोनीने एक उंच षटकार ठोकल्यानंतर तो चेंडू त्या मुलीला जाऊन लागला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आणि भारतीय मुलीची भेट होऊ शकली नाही. भेटण्याआधीच त्या दोघांची प्रेमकहाणी धोनीच्या षटकाराने संपुष्टात आली. भेट न झाल्याने पाकिस्तानी खेळाडूचे मन विचलीत झाले होते.
धोनीसाठी पाकिस्तान खास आहे
एमएस धोनीने 2004 मध्येच बांगलादेशविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचे पदार्पण फारसे खास नव्हते. मात्र, यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध घरच्या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात स्वत: चे स्थान पक्के केले. धोनीने पाकिस्तान विरुद्धच वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. तत्पूर्वी, धोनीला त्याच्या फलंदाजीद्वारे चांगली कामगिरी करता आली नव्हती; पण विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आला आणि त्याने 148 धावा केल्या आणि संघात आपले स्थान निश्चित केले.
एमएस धोनी हा भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोनदा विश्वचषक जिंकला आहे. सन 2007 मध्ये त्यांची टी -20 कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आणि सन 2017 पर्यंत तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होता. गतवर्षी 15 ऑगस्ट रोजी धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून निवृत्तीची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड! ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या मार्गावर, तोडू शकतो कपिल देव यांचा ‘मोठा’ रेकॉर्ड
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती