भारतीय पुरुष क्रिकेटसाठी 2022 वर्ष काही खास ठरले नाही की नाही याबाबत संभ्रमता आहे. एकीकडे 19 वर्षाखालील पुरुष संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली, दुसरीकडे महिला क्रिकेटने इंग्लंडला त्यांच्याच घराच वनडे मालिकेत पराभूत करत इतिहास रचला. असे अनेक विक्रम केले गेले. वरिष्ठ पुरुष संघाने देखील अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या विशेष करून घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली, मात्र अनेक महत्वाच्या स्पर्धांचे विजेतेपद जिंकता आले नाही. यावेळी भारतीय संघात एक बदल झाला. तो संघासाठी चांगला की वाईट हे तुम्हीच सांगा.
विराट कोहली (Virat Kohli) याने 2021च्या टी20 विश्वचषकानंतर भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर तो वनडे कर्णधारपदावरूनही पायउतार झाला. या बदलानंतर मर्यादित षटकात भारत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. कारण नव्या कर्णधाराची नियुक्ती होणार होती, ज्याने टी20 लीग गाजवली होती. विराटची कर्णधार म्हणून कामगिरी पाहिली तर त्याने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मदतीने कसोटी क्रिकेट गाजवले. या जोडीने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत केले. असे असले तरी भारताला आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकता येत नव्हते, यामुळे नेतृत्व आणि प्रशिक्षण या दोन्हीमध्ये बदल झाला आणि रोहित शर्मा-राहुल द्रविड ही जोडी पाहायला मिळाली.
भारताचा नवा कर्णधार-हेड कोच
रोहितने विराटनंतर भारताच्या टी20 आणि वनडे संघाचे कर्णधारपद स्विकारले. त्याने आयपीएलमध्ये स्वत:ला एक चांगला कर्णधार सिद्ध केले. त्याचबरोबर भारत त्याच्या नेतृत्वाखाली 2018मध्ये आशिया कप आणि श्रीलंकेतील तिरंगी मालिका जिंकला. यामुळेच काय ते त्याला भारताचा कर्णधार केले गेले. त्याचा चांगला परिणामही दिसला. जेव्हा भारताने 2021च्या टी20 विश्वचषकानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडला टी20 मालिकेत पराभूत केले.
सुरूवात चांगली झाली मात्र नंतर रोहितला दुखापतींनी घेरले यामुळे तो अनेक सामन्यांना मुकला. तो त्याच्या कारकिर्दीत कर्णधार म्हणून पहिल्या विदेशी दौऱ्यास मुकला. दक्षिण आफ्रिकेच्या त्या दौऱ्यात भारत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा पराभूत झाला.
2022मध्ये भारताचे नेतृत्व एक नाही, दोन नाही तर अनेकांनी केले
काही काळानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. तेव्हा पुन्हा एकदा रोहितला जबाबदारी देण्यात आली आणि 34 वर्षाचा हा खेळाडू भारताच्या तिन्ही प्रकाराचा कर्णधार झाला. 2022वर्ष भारताच्या कर्णधार-बदलांमुळे खूपच गाजले. कोणताच संघ एवढ्या कर्णधारांच्या खाली खेळला नसेल जेवढा भारत यावर्षी खेळला. कारण भारत यावर्षी 71 सामने खेळला. ज्यामधील 32 सामन्यांना रोहित मुकला. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
यावर्षी टी20 विश्वचषक खेळला जाणार होता, त्याची जोरात तयारी भारताने केली. यासाठी संघाने अनेक टी20 मालिका खेळल्या, मात्र निवडकर्ते आणि संघ यांच्यात ताळमेळ दिसला नाही आणि भारताने अनेक महत्वाचे सामने गमावले. रोहितच्या अनुपस्थितीत भारत 4 कसोटी आणि 5 मर्यादित षटकांच्या कर्णधारांच्या खाली खेळला. जो एक विक्रम ठरला.
आशिया चषकानंतर टी20 वर्ल्डकपमध्येही निराशा
आयपीएलमध्ये रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना संघाला 5 विजेतेपद जिंकून दिले, मात्र भारताने नेतृत्व त्याला जमले नाही असे चाहत्यांनी म्हटले. त्याच्या नेतृत्वाची खरी परिक्षा आशिया चषकात होती. जेथे तो पूर्णपणे फेल ठरला. भारत या स्पर्धेत सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभूत झाला. यामुळे भारत स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर भारताचे टी20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंग झाले. यादरम्यान रोहित एक कर्णधार म्हणून अपयशी तर ठरलाच मात्र तो फलंदाज म्हणूनही काही खास करू शकला नाही.
रोहित नेतृत्वाबरोबर धावा करण्यातही फेल
2019 वनडे विश्वचषकात एका मागोमाग एक शतक करणारा रोहितची बॅट 2022च्या विश्वचषकात शांतच राहिली. या स्पर्धेच्या 6 सामन्यात त्याने 116 धावा केल्या. यावर्षी त्याने 2 कसोटी, 8 वनडे आणि 29 टी20 सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 90, 249 आणि 656 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमबॅक्स इन 2022! विराटचे शतक, इंग्लंडचे बझबॉल आणि बरचं काही…
मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी एका दिग्गजाची एन्ट्री! निभावणार ‘ही’ जबाबदारी