---Advertisement---

Semi Final 2: दक्षिण आफ्रिकेसाठी मिलरची एकाकी झुंज! ऑस्ट्रेलियासमोर फायनलसाठी 213 धावांचे आव्हान

---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारी (16 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर खेळला जातोय. असे असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेवर दबाव आणत त्यांचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 24 धावांमध्ये माघारी पाठवले. मात्र, त्यानंतर मधल्या फळीत हेन्रिक क्लासेन याने 47 व डेव्हिड मिलर याने शानदार शतक करत संघाला 212 पर्यंत पोहोचवले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1725133810604671319?t=NYq23zWT8C-zfuD_MWOzXA&s=19

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. कर्णधार बवुमा पहिल्याच षटकात खातेही न खोलता बाद झाला. मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड या जोडीने दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकत धावा काढू दिल्या नाहीत. त्यामुळे डी कॉक हा देखील केवळ तीन धावा करून तंबूत परतला. मार्करम व डसेन यांनी थोडाफार संघर्ष केला मात्र ते देखील बाद झाले. चार बाद 24 अशी खराब अवस्था असताना मिलर व क्लासेन या जोडीने संघाचा डाव सावरला व 95 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्लासेन 47 धावा करून बाद झाला. त्याला व जेन्सनला हेडने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर मिलरने डावाची सूत्रे हाती घेताना आक्रमक फटकेबाजी केली. त्याने आपल्या विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 48 व्या षटकात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 212 धावांवर समाप्त झाला.

(2023 ODI World Cup Semi Final 2 South Africa Post 212 Against Australia Miller Hits Century)

हेही वाचा-
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---