fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२४३ भारतीय गोलंदाजांपैकी असा भीम पराक्रम करणारा आर अश्विन केवळ तिसराच!

इंदोर। आजपासून(14 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विनने(R Ashwin) बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकची(Mominul Haque) विकेट घेत एक खास विक्रम केला आहे.

अश्विनने मोमिनुलला बाद करत भारतात 250 कसोटी विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला आहे. मायदेशात 250 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी विकेट्स(250+ test wickets at home) घेणारा अश्विन हा केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. तर जगातील 10 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी असा पराक्रम अनिल कुंबळे(Anil Kumble) आणि हरभजन सिंग(Harbhajan Singh) या भारतीय गोलंदाजांनी केला आहे.  कुंबळेने भारतात खेळताना 63 कसोटी सामन्यात 350 विकेट्स घेतल्या आहेत. तर हरभजनने भारतात 55 कसोटी सामन्यात 265 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने भारतात 250 विकेट्सचा टप्पा 42 व्या कसोटी सामन्यात खेळताना पूर्ण केला आहे. त्यामुळे त्याने मायदेशात सर्वात जलद 250 विकेट्स घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या(Muttiah Muralitharan) विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

मुरलीधरननेही श्रीलंकेत खेळताना 42 सामन्यात 250 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता.

त्याचबरोबर मायदेशात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही सध्या मुरलीधरनच्याच नावावर आहे. मुरलीधरनने आत्तापर्यंत श्रीलंकेत 73 कसोटी सामने खेळताना 493 विकेट्स घेतल्या आहेत.

मायदेशात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

493 – मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)

368 – जेम्स अँडरसन (इंग्लंड)

350 – अनिल कुंबळे (भारत)

319 – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)

305 – स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)

289 – ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)

278 – रंगना हेराथ (श्रीलंका)

265 – हरभजन सिंग (भारत)

261 – डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

250 – आर अश्विन* (भारत)

You might also like