fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

असा लाजीरवाणा विक्रम गेले ६५ वर्ष आहे न्यूझीलंड संघाच्या नावावर

26 all out: The nightmare that still haunts New Zealand cricket

मुंबई | क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ मजबूत मानले जात होते. याचदरम्यान इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅशेस मालिका जिंकून मोठ्या आत्मविश्वासाने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना झाला. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 1955 साली दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका न्यूझीलंड क्रिकेट संघ कधीच विसरू शकणार नाही. कारण याच कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे

या मालिकेतील डुनेडिन येथे झालेला पहिला सामना इंग्लंडने चमकदार कामगिरी करत आठ गडी राखून विजय मिळवला होता. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातला काळा दिवस मानला जातो. याच कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ 26 धावांवर सर्वबाद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आजही अबाधित आहे.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 200धावा काढल्या तर प्रत्युत्तरात इंग्लंडने 246 धावा काढत आघाडी मिळविली होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या संघातील पाच खेळाडू हे शून्यावर बाद झाले. केवळ बर्ट सुटक्लिफे या खेळाडूला दुहेरी धावा काढता आल्या तर उर्वरित संघ 26 धावांवर सर्वबाद झाला. सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याचा न्यूझीलंड संघाचा विक्रम आज 65 वर्षानंतर देखील अबाधित आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या या गचाळ कामगिरीनंतर चाहत्यांमध्ये घोर निराशा पसरली. मात्र, या संघाचा कर्णधार ज्योफ राबोणे हा संघाच्या समर्थनात उतरला. ही मालिका खेळण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ एक वर्षापेक्षा जास्त वेळ कसोटी क्रिकेट खेळला नव्हता. परिणामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 अशा फरकाने लाजिरवाणा पराभव झाला होता.