fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल इतिहासातील ३ फलंदाज, ज्यांनी डावातील शेवटच्या ३ षटकात कुटल्यात सर्वाधिक धावा

3 Batsman In IPL History With Most Runs In Last 3 Overs Of Inning

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५२ धावा केल्या. एकवेळ ३ बाद १३ अशी अवस्था असलेल्या संघाला पुढे कर्णधार श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक रिषभ पंतच्या फलंदाजीने सावरले. त्यानंतर पुन्हा ६ बाद ९६ अशा मोठ्या संकटात संघ सापडला.

त्यानंतर १५व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोयनिसने मात्र जोरदार धमाका केला. त्याने केवळ २१ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला केएल राहुल व निकोलस पुरनने धावबाद केले. परंतू धावबाद होण्यापुर्वी त्याने एक खास विक्रम केला. तो आयपीएल सामन्याच्या एका डावातील शेवटच्या ३ षटकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

त्याने डावातील शेवटच्या ३ षटकात म्हणजे १८, १९ आणि २०व्या षटकात केवळ १४ चेंडूंत ४९ धावा ठोकल्या आहेत. त्याच्या आधी या यादीत आंद्रे रसल दूसऱ्या आणि विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे. 3 Batsman In IPL History With Most Runs In Last 3 Overs Of Inning

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराटने २०१६ साली गुजरात लायन्सविरुद्ध खेळताना डावातील शेवटच्या ३ षटकात सर्वाधिक ५७ धावा कुटल्या होत्या. त्याने हा कारनामा केवळ १४ चेंडूत केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रसलने गतवर्षी डावातील शेवटच्या ३ षटकात ५० धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केवळ १७ चेंडूंचा सामना करताना त्याने हा पराक्रम होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-षटकार- चौकारांची बरसात करत मार्कस स्टोयनीसने केला अजब कारनामा

-इकडे आयपीएल सुरु असताना ‘त्याने’ तिकडे क्रिकेटमध्येच रचला अनोखा इतिहास

-पहिल्या सामन्यातील ‘किंग’ समजल्या जाणाऱ्या खेळाडूला पंजाबने दाखवला बाहेरचा रस्ता

ट्रेंडिंग लेख-

-पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू अनिल दलपत

-यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू

-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान


Previous Post

संघाचा डाव सावरत असलेले दिल्लीचे २ मोहरे झाले सलग बाद, पण ‘हा’ खेळाडू ठरला गेमचेंजर

Next Post

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

April 21, 2021
Next Post

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी

राजस्थान रॉयल्सला बसला जबरदस्त धक्का; हा खेळाडू सीएसकेविरुद्ध खेळणार नाही सामना

आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.