इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी असे म्हटले जात होते की, युएईच्या मैदानावर फलंदाजांपेक्षा जास्त गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळेल. कारण युएईची मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर ठरतील. तसेच येथील मैदानेही आकाराने मोठी असल्यामुळे फार थोड्या प्रमाणात षटकार पाहायला मिळतील. मात्र युएईत चालू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात या सर्व गोष्टी खोट्या ठरताना दिसल्या. कारण आतापर्यंतच्या सामन्यात कित्येक फलंदाजांची मोठी खेळी करत षटकारांचा पाऊस पाडला आहे.
इशान किशन, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, कायरन पोलार्ड अशा बऱ्याच फलंदाजांच्या ताकदीपुढे युएईचे स्टेडियम छोटे पडले. अर्थातच त्यांनी एकाहून एक जबरदस्त षटकार मारले. मात्र याउलट काही दिग्गज फलंदाजांना संधी मिळाल्यानंतर एकही षटकार मारता आलेला नाही. या लेखात आम्ही त्याच दिग्गज फलंदाजांना आढावा घेतला आहे.
आयपीएल २०२०मध्ये एकही षटकार न मारणारे तीन दिग्गज फलंदाज
श्रेयश गोपाल
स्टिव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू श्रेयश गोपालचा या यादीत समावेश आहे. या शिलेदाराला एक-दोन नव्हे तर साखळी फेरीतील तब्बल १४ सामन्यात अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले होते. तरीही तो नाबाद २३ धावांच्या सर्वोत्तम वेयक्तिक धावसंख्येसह ३७ धावा करु शकला आहे. दरम्यान त्याला एकही षटकार मारता आलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, एका आयपीएल हंगामात १०पेक्षा जास्त सामन्यात संधी मिळूनही एकही षटकार न मारता येण्याची ही त्याची दूसरी वेळ आहे. यापुर्वी २०१८ साली त्याने हा नकोसा पराक्रम केला होता. त्यावेळी पूर्ण हंगामात गोपालने ११ सामन्यात एकही षटकार न मारता ५० धावा केल्या होत्या.
केदार जाधव
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ यावर्षी फ्लॉप ठरला आहे. त्यातही ३५ वर्षीय केदार जाधव सुपर-डुपर फ्लॉप ठरला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याने पूर्ण हंगामात ८ सामने खेळले असून केवळ ६२ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. दरम्यान त्याला एकही षटकार मारता आलेला नाही.
ग्लेन मॅक्सवेल
किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला यंदा मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला आहे. यामागचे कारण ठरली आहे त्याची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागातील वाईट कामगिरी. पंजाब संघाने त्याला हंगामातील १३ सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले होते. तरीही तो साधा एक षटकारदेखील मारु शकला नाही. त्याने या १३ सामन्यात १५.४२च्या सरासरीने १०८ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!
महत्त्वाच्या बातम्या-
दोघांनीही गुरुवारी साजरा केला आपला वाढदिवस, एकाने दाखवला दुसऱ्याला तंबूचा रस्ता
मुंबई इंडियन्सच्या यशाआड झाकलं जातंय कर्णधार रोहित शर्माचं अपयश?
प्ले ऑफला हैदराबादविरुद्ध नुसता संघ जाहीर करुनही विराटने केला खतरनाक विक्रम