fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ३ आयपीएल संघात आहेत दर्जेदार फिरकीपटू, जे गाजवतील यूएईतील मैदानं

September 16, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau


टी-२० क्रिकेट प्रकारातील सर्वांच्या पसंतीची स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी चाहत्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली. कारण कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा नियोजित वेळी होऊ शकली नाही. पण अखेर आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे.

आयपीएलच्या या हंगामासाठी सर्व संघ पूर्णपणे सज्ज आहेत. हा हंगाम युएईमध्ये असल्याने तेथील खेळपट्ट्या अतिशय संथ आणि फिरकी गोलंदाजांना उपयुक्त अशा आहेत. त्यामुळे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा हा हंगाम फिरकी गोलंदाज गाजवण्याची शक्यता जास्त आहे. सर्व संघांकडे उत्तम फिरकी गोलंदाज आहेत, परंतु या लेखात त्या ३ संघांबद्दल जाणून घेऊ ज्यांच्याकडे सर्वाेत्तम फिरकी गोलंदाज आहेत.

या ३ संघांकडे फिरकी गोलंदाजीची मोठी फळी

चेन्नई सुपर किंग (Chennai Super Kings)

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ प्रत्येक हंगामात विजयाचा मोठा दावेदार असतो. या वेळीसुद्धा धोनी ब्रिगेड मजबूत दावेदार आहे. या संघात फलंदाज गोलंदाजाचा उत्तम संयोजन आहे. या सर्वांमध्ये सीएसकेमधील फिरकी गोलंदाजी ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

सीएसके संघात इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, पियुष चावला आणि कर्ण शर्मासारखे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. तसेच युवा फिरकी गोलंदाज सई किशोर देखील आहे. याशिवाय संघात केदार जाधवही महत्वाची भूमिका निभावू शकतो. एकूणच फिरकीच्या बाबतीत चेन्नईचा संघ जबरदस्त आहे.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

आयपीएल मधील सनरायझर्स हैदराबाद हा एक उत्तम संघ आहे. सनरायझर्सकडे फलंदाजीत आणि गोलंदाजीत चांगले पर्यायी खेळाडू आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाला आतापर्यंत फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले आहे.

सनरायझर्स संघामध्ये उत्तम फलंदाज तर आहेतच तसेच फिरकी गोलंदाजी सुद्धा जबरदस्त आहे. त्यांच्याकडे राशिद खान सारखा अनुभवी गोलंदाज आहे. याशिवाय मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि फॅबियन ऍलन सारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्याचबरोबर पर्यायी म्हणून संजय यादव, अब्दुल समद आणि विराट सिंगही आहेत.

दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाला अद्याप एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल संघाने शानदार प्रदर्शन केले होते. यंदाही त्यांचा संघ एक बलाढ्य संघ म्हणून स्वत: ला सिद्ध करण्यास सज्ज असेल. यावेळी दिल्ली संघातही काही अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे.

या संघाच्या फिरकी गोलंदाजीत अमित मिश्रा, आर अश्विन आणि अक्षर पटेल असे उत्तम फिरकीपटू आहेत. त्याचबरोबरच संदीप लामिछाने आणि ललित यादव देखील आहेत.


Previous Post

विराट कोहलीनंतर ‘हा’ खेळाडू करू शकतो भारतीय संघाचे नेतृत्व; माजी दिग्गजाने सांगितले नाव…

Next Post

आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट

Related Posts

Photo Courtesy: MS File Photo
टॉप बातम्या

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट

Photo Courtesy: Twitter/ ICC

भारताबरोबर मालिका न झाल्याने पाकिस्तानचे झाले तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान

Photo Courtesy: Twitter/ ICC

आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूश; चक्क स्टेडियमवर जाऊन...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.