आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक कर्णधारावर मोठी जबाबदारी असते. त्याच बरोबर त्याला दुहेरी भूमिका निभावणे आवश्यक असते, मैदानात कर्णधार म्हणून योजन्या करण्यासोबत त्याला एक खेळाडू म्हणून त्याचे व्यक्तीगत प्रदर्शनपण चांगले करावे लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहुतेक फलंदाजच कर्णधार झालेले दिसले आहे . गोलंदाज हे खूप क्वचित वेळेस संघाचा कर्णधारपद सांभाळताना दिसतात. हा एक ट्रेंड राहिला आहे आणि तो भारतीय संघातपण बघण्यात आले आहे.
कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना संघाला जिंकून देणे यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट कोणत्याच कर्णधारासाठी नसते. आत्तापर्यंत अनेक प्रसंगी कर्णधारांनी आपल्या उत्कृष्ट खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले आहे. या लेखात कर्णधार म्हणून खेळताना एकदिवसीय सामन्यातील डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या तीन फलंदाजांचा उल्लेख केला आहे.
सनथ जयसूर्या
कर्णधार म्हणून श्रीलंकेच्या या विस्फोटक फलंदाजाने त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळी ही भारता विरुद्ध केली. २००० सालामध्ये जयसूर्याने भारताविरुद्ध खेळताना १८९ धावांची खेळी उभारली होती. त्या डावात त्याने १६९ चेंडूंचा सामना केला होता. ही खेळी अनेक वर्षे अव्वल स्थानी राहिली होती.
रोहित शर्मा
ज्या प्रकारे जयसूर्याने भारत विरुद्ध सर्वोच्च धावा केल्या होत्या, त्याच प्रकारे रोहित शर्माने २०१७ मध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला बोल केलेला. चंदीगडमध्ये कर्णधार म्हणून खेळताना श्रीलंके विरुद्ध रोहितने १५१ चेंडूंचा सामना करत नाबाद २०८ धावांची खेळी उभारली होती. या सामन्यात भारतीय संघाचा १४१ धावांनी मोठा विजय झाला होता.
वीरेंद्र सेहवाग
या भारतीय फलंदाजाने आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. इंदौरमध्ये भारतीय कर्णधार म्हणून खेळताना वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडीज समोर १४९ चेंडूंचा सामना करताना २१९ धावांची मोठी खेळी उभारली होती. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय मिळवला होता. कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“परदेशी खेळाडूविना आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखीच असेल”
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर
धोनी संघात असल्याने नियमितपणे सामने खेळण्याची संधी मिळत नसे, ‘या’ यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया