पाकिस्तानी फलंदाज बाबर आजमने आपल्या चुलतबहिनी सोबत विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आजम आणि चुलत बहिणीचे कुटुंबीय यांच्यामध्ये लग्नाविषयी एकमत झालेले असून पुढील वर्षी ते लग्नगाठ बांधतील, असे वृत्त काहीदिवसांसमोर आले आहे.
अनेकजण ही बातमी एकूण एकूण हैराण झाले असाल की चुलत बहिणीसोबत लग्न? हे कस शक्य आहे, पण मुस्लिम धर्मामध्ये अशा विवाहाला मान्यता आहे. यापूर्वीही असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या बहिणीशी लग्न केले आहे. आज आपण या खास लेखात अशा तीन खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी आपल्या बहिणीसोबतच लग्नगाठ बांधली.
शाहिद आफ्रिदी:
पाकिस्तानचा माजी विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने देखील आपली मामेबहीण नादिया सोबत लग्न केले आहे. परंतु त्यांचा हा प्रेमविवाह नसून, आफ्रिदीच्या वडिलांच्या इच्छेनुसार ह्यांचा विवाह झाला होता. आफ्रिदी आपल्या संसारिक जीवनात खुश असून त्यांना 5 मुली देखील आहे.
आफ्रिदीने पाकिस्तान संघाचे 27 कसोटी, 398 एकदिवसीय आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत प्रतिनिधित्व केलेलं असून कसोटीत 36.51 च्या सरासरीने 1716 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 23.57 च्या सरासरीने 8064 धावा आणि 98 टी20 सामन्यांत 18.01 च्या सरासरीने 1405 धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 48 बळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 395 व टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 58 बळी टिपले आहेत.
सईद अन्वर:
माजी पाकिस्तानी खेळाडू सईद अन्वर देखील आपली चुलत बहीण लुबाना सोबत 1996 मध्ये विवाहबंधनात अडकला होता. लुबाना पेशाने डॉक्टर आहे. ह्या दोघांना एक मुलगी होती बिस्मा. परंतु तिचा 2001 मध्ये दीर्घ एका दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला होता.
ऑगस्ट 2001 साली आशियाई कसोटी स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर दोनच दिवसांनी अन्वरच्या मुलीचा मृत्यू झाला, त्यामुळे अन्वर लाहोरला पुन्हा परतला व तोच त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा कसोटी सामना ठरला होता. त्यानंतर तब्बल 2 वर्ष तो क्रिकेट पासून दूर होता.
सईद अन्वरने पाकिस्तानकडून खेळतांना 55 कसोटी सामन्यांत 45.52 च्या सरासरीने एकूण 4052 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 11 शतकांचा समावेश आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने 247 सामन्यांत 39.21 च्या सरासरीने 8824 धावा केल्या आहेत. ज्यात 20 शतकांचा समावेश आहे.
मुस्तफिजुर रहीम:
मुस्तफिजुर रहीमने ज्या मुलीसोबत निकाह केलाय तीच नाव सामिया परवीन शिमु आहे आणि ही सुद्धा नात्याने रहीमची चुलत बहीण लागते व तिने ढाका युनिव्हर्सिटीतुन आपली पदवी पूर्ण केली आहे. मुस्तफिजुरचा भाऊ महफजुर रहीमने सांगितलं की न्युझीलंड हल्ल्यानंतर घरी परतेतला मुस्तफिजुर खूपच निराश आणि दुःखी होता. त्यामुळे आम्ही त्याचा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
न्युझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बांगलादेशी खेळाडू थोडक्यात बचावले होते. ह्या वेगवान गोलंदाजाने बांगलादेश संघासाठी 14 कसोटी, 67 एकदिवसीय आणि 42 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून त्याने कसोटीत 30, एकदिवसीय क्रिकेट मध्ये 124 आणि आंतरराष्ट्रीय टी20 58 बळी टिपले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव
भविष्यातील स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावारुपास येत असलेला ‘सॅम करन’
सचिनची मुलगी अन् शुबमनच्या अफेअरची चर्चा सुस्साट; पण त्यामागची कारणं माहितीयेत का? वाचा