क्रिकेट या खेळात अनेकदा क्षेत्ररक्षकाने घेतलेल्या अफलातून झेलाची चर्चा होत असते. अगदी बाऊंड्री लाईनवरही खेळाडूंनी अनेकदा अप्रतिम झेल घेण्याचा कारनामा केला आहे. पण बुधवारी (१३ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात तीन खेळाडूंना मिळून देखील एक झेल घेता आला नाही. ही घटना मार्श चषकात साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्विन्सलँड यांच्यातील वनडे सामन्यात घडली.
या सामन्यात क्विन्सलँड संघ फलंदाजी करत असताना ३६ व्या षटकात ब्रेंडन डॉगेटने टाकलेल्या ५ व्या चेंडूवर मायकल नेसेरने डीप-स्क्वेअर लेगला एक हवेतून शॉट खेळला. त्यावेळी बाऊंड्री लाईनजवळ तीन खेळाडूंनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर हा शॉट षटकारासाठी गेला. यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही खेळाडूंना चेंडू पकडताना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Trying to salvage something out of 2021 😝 #MarshCup pic.twitter.com/WLxxeCHeWL
— cricket.com.au (@cricketcomau) October 13, 2021
दरम्यान, याच सामन्यात साऊथ ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने द्विशतक झळकावले. त्याने १२७ चेंडूच २३० धावा केल्या. त्याने ११४ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. या खेळीदरम्यान त्याने २८ चौकार आणि ८ षटकार मारले होते. ही खेळी मार्श चषक स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. यापूर्वी २०१८ मध्ये डार्सी शॉर्टने २५७ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.
त्याच्या या खेळीच्या जोरावर साऊथ ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकात ३९१ धावा केल्या. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता.
त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या क्विन्सलँड संघाने ४०.३ षटकात सर्वबाद ३१२ धावाच केल्या. त्यामुळे साऊथ ऑस्ट्रेलियाने हा सामना ६७ धावांनी जिंकला. क्विन्सलँड संघाकडून सॅम हेजलेटोने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. तर नेसेरने ५५ धावांची खेळी केली. तसेच साऊथ ऑस्ट्रेलियाकडून ब्रेंडन डोगेटने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरच्या यशाचा सूत्रधार नसणार विश्वचषक संघाचा भाग! कर्णधारानेच दाखवला अविश्वास
जमतंय! आवेशच्या जाळ्यात २ वेळा अडकला धोनी, कर्णधार पंतच्या ‘या’ रणनितीचा यामागे राहिलाय वाटा