कोरोना या साथीच्या आजारामुळे क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. जवळपास 7 महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू बाउंस होतो आणि वेगवान गतीने बॅटवर येतो. त्यामुळे या खेळपट्ट्यांवर गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असते.
भारतीय संघाने यापूर्वी केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. या लेखात आपण 3 आघाडीच्या भारतीय गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
3. युझवेंद्र चहल
सन 2019 मध्ये मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने उत्कृष्ट कामगिरी केली होती. चहलने आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच त्रस्त केलं होतं. त्याने 10 षटकांत 42 धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या 6 गोलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. चहलच्या शानदार गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलिया संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयश आले आणि भारतीय संघाने सहजरित्या ७ विकेट्सने सामना जिंकला होता.
2. अजित आगरकर
माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आगरकर दुसऱ्या स्थानी आहे. सन 2004 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर विबी मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात आगरकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं. उत्कृष्ट गोलंदाजीनंतरही भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताला 18 धावांनी पराभूत केले होते.
1. मुरली कार्तिक
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांसारखे दिग्गज फिरकीपटू संघात असल्यामुळे फिरकीपटू मुरली कार्तिकला भारतीय संघाकडून खेळण्याची फार कमी संधी मिळाली. तथापि, कार्तिकने मिळालेल्या संधीचं सोन केलं. सन 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात कार्तिकने आपल्या फिरकी गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. कार्तिकने 10 षटकांत 27 धावा देत 6 बळी घेतले होते.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित आणि ईशांत मुकण्याची शक्यता
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश