न्यूझीलंडचा क्रिकेट संघ हा असा एक संघ आहे जो अतिशय शांत व संयमी संघ म्हणून ओळखला जातो. कमी परंतु नियोजनबद्ध क्रिकेट खेळणारा देश म्हणून न्यूझीलंडकडे पाहिलं जातं.
या देशात कसोटी सामने जिंकणे एक महाकठीण काम आहे. अगदी जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीच्या टीम इंडियालाही हे २०२०मध्ये जमले नाही तर.
न्यूझीलंडमध्ये जगातील ९ देश कसोटी सामने खेळले आहेत. त्यात इंग्लंड (१८), ऑस्ट्रेलिया (१४) व पाकिस्तान (१०) यांनाच तेथे १० विजय मिळवता आले आहे. 3 Indian Captain to Win Test Match in a New Zealand.
भारतीय संघ येथे ८ कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली २५ कसोटी सामने खेळला. परंतु भारताला येथे केवळ ५ विजय मिळवता आले असून १० कसोटी सामन्यात पराभव तर १० सामने अनिर्णित राहिले आहे. १९६८ साली भारताने प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता.
३. सुनिल गावसकर (१ कसोटी विजय)
भारताने १९७६ साली सुनिल गावसकरांच्या नेतृत्त्वाखाली १९७६ साली ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. यात भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. पहिला कसोटी सामना भारताने जिंकल्यानंतर दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. तर तिसरा सामन्यात न्यूझीलंडने भारतावर डावाने विजय मिळवला होता.
२. एमएस धोनी (१ कसोटी विजय)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली २००९ व २०१४ असे दोन न्यूझीलंडचे दौरे केले. २००९मध्ये भारताने येथे ३ कसोटी सामने खेळले. यातील पहिला सामना भारताने जिंकला तर दुसरा व तिसरा सामना अनिर्णित राहिले. त्यामुळे भारताने ही मालिका १-०ने जिंकली. २०१४मध्ये धोनीच्याच नेतृत्त्वाखाली भारताने २ कसोटी सामने खेळले व त्यात पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरा सामना अनिर्णित राहिला.
१. मन्सूर अली खान पतौडी (३ विजय)
१९६७-६८मध्ये भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा मन्सूर अली खान पतौंडींच्या नेतृत्त्वाखाली दौरा केला. यात सर्व सामन्यांचे निकाल लागले. भारतीय संघाला केवळ दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
ट्रेंडिंग घडामोडी-
–दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार
–भारतात एकही कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं