fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर

August 30, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल आल्यानंतर क्रिकेटमध्ये खूप बदल झाले. कोणताही खेळाडू संघात पुनरागमन किंवा जागा बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन करून तो संघात येऊ शकतो. असं फक्त भारतीय खेळाडूंसाठीच नाही, तर विदेशी खेळाडूंसाठीही आहे.

तसं तर सर्वांनाच वाटतं, की बॅट आणि चेंडूत चांगलाच फरक पहायला मिळावा. पण बरेच चाहते असे असतात, जे फक्त चौकार आणि षटकारांची अपेक्षा करतात. टी२० ला जलद क्रिकेटही म्हटलं जातं. इथं कायम मोठ्या धावसंख्येचे सामने पहायला मिळतात. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. सर्वात जास्त चौकार शिखर धवन (Shikhar Dhawan), तर सर्वात जास्त षटकार ख्रिस गेलने (Chris Gayle) मारले आहेत.

पण असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या पूर्ण आयपीएल कारकीर्दीत एकही चौकार मारला नाही.

आयपीएल कारकीर्दीत एकही षटकार न ठोकणारे ३ भारतीय खेळाडू- 3 Indian Players who Could not Manage to hit a Six or Four in IPL

युझवेंद्र चहल

आयपीएलमध्ये युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आतापर्यंत दोन संघांकडून खेळला आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून केली. पण २०१४ ला तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा सदस्य बनला. भारताच्या या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाचे आकडे आयपीएलमध्ये उल्लेखनीय आहेत. त्याने ८४ सामन्यांत २३.१८ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत.

फलंदाजी करताना चहलचे आकडे खूप खराब आहेत. त्याने ८४ सामान्यत फक्त २१ धावा केल्या आहेत. यात त्याची ४ ही सर्वश्रेष्ठ धावसंख्या आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीत एकही चौकार किंवा षटकार ठोकला नाही.

प्रज्ञान ओझा

भारतीय संघाचा डाव्या हाताचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाचे (Pragyan Ojha) आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना आकडे प्रशंसनीय आहेत. तो २०१० आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणार गोलंदाज होता. तर २००९ मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या डेक्कन चार्जर्स संघाचा तो सदस्य होता. त्याने ९२ सामन्यात २६.२० सरासरीने ८९ विकेट्स घेतल्या आहेत.

पण फलंदाजी करताना त्याची आकडेवारी फार काही चांगली नाही. त्याने ९२ सामन्यांत १७ धावा केल्या आहेत. तर ४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीत एकही चौकार ठोकला नाही.

सिद्धार्थ कौल

भारतीय संघाचा उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज सिद्धार्थ कौलने (Siddharth Kaul) आपल्या आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत ४५ सामान्यत २८.२६ च्या सरासरी आणि ८.४७ इकॉनॉमी रेटने ४९ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने ४५ सामन्यांत फलंदाजी करताना फक्त १२ धावा केल्या आहेत. तर ७ ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. या दरम्यान त्याला एकही चौकार मारता आला नाही, तर त्याने भारतासाठी टी२० आणि वनडे सामनेही खेळले आहेत.

वाचनीय लेख-

-स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू

-टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज

-१२ पेक्षा कमी चेंडू खेळूनही मॅन ऑफ द मॅच ठरलेले ३ खेळाडू


Previous Post

आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा

Next Post

मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

सॅम करनच्या षटकात पॅट कमिन्सने चोपल्या तब्बल ३० धावा, पाहा डोळे दिपवणाऱ्या फटकेबाजीचा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Screengrab/@Cricsphere
IPL

डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर फेबियन एलनने केला अजब डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने

एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज

आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.