fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू

August 29, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे ‘खेळाडूंचा लिलाव’. या लिलावाला खूप महत्त्व दिले जाते. आयपीएलचे वेगवेगळे फ्रंचायझी कित्येक रुपयांच्या किंमतींना वेगवेगळ्या खेळाडूंना विकत घेत असतात. मात्र, अनेकदा हंगामात सर्वात महागडे ठरणारे खेळाडू चांगले प्रदर्शन करु शकत नाहीत.

२०१८ सालच्या आयपीएल हंगामात केसी करियप्पा, वरुण चक्रवर्ती आणि टी. नटराजन हे खेळाडू त्यांच्या किंमतींमुळे खूप चर्चेत आले होते. मात्र, त्यांना अपेक्षेइतकी चांगली खेळी करता आली नाही.

या लेखात आपण अशाच ३ भारतीय खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांना लिलावात १० कोटींपेक्षा जास्त रक्कमेची बोली लागूनही, ते अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत.

3 Indian Players Who Got 10 Crore Plus Rupees In IPl Auction But Failed Perform

१. दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१५) –

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा २०१४-१५मध्ये भारतीय संघाचा नियमित सदस्य नव्हता. तरीही अनुभवी फलंदाज कार्तिकला आयपीएल २०१४मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने १२.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलच्या ७व्या हंगामात कार्तिकने चांगले प्रदर्शन केले. यावेळी १४ सामन्यात त्याने ३२५ धावा केल्या होत्या. तरीही पुढील हंगामात दिल्ली डेअरडेविल्सने त्याला संघातून बाहेर काढून टाकले.

परंतु, आयपीएलच्या ८व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कार्तिकला १०.५ कोटी रुपयांसह आपल्या संघात सामाविष्ट केले होते. त्यावेळी बेंगलोरच्या सपाट खेळपट्टीवर कार्तिकची फलंदाजी तग धरु शकली नाही. त्याने संपूर्ण हंगामात १२.८१च्या सरासरीने फक्त १४१ धावा केल्या.

२. युवराज सिंग (दिल्ली डेअरडेविल्स, २०१५) –

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा २०१४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि २०१५मद्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाचा भाग होता. आयपीएलच्या ७व्या हंगामात युवराजने बेंगलोर संघाकडून चांगली खेळी केली. मात्र, हाच फलंदाज पुढील ८व्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळताना फ्लॉप ठरला. 

आयपीएलच्या ७व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने युवराजला १४ कोटींना विकत घेतले होते. या संपूर्ण हंगामात त्याने १४ सामन्यात ३७६ धावा केल्या होत्या. यात त्याने ३ वेळा केलेल्या ५० पेक्षा जास्त धावांचा समावेश होता. शिवाय, युवराजने या हंगामात २९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. तसेच तो पूर्ण हंगामातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूदेखील ठरला होता. तरीही बेंगलोरने त्याला आपल्या संघातून काढून टाकले होते.

पुढे, युवराजचा हा फॉर्म आयपीएलच्या ८व्या हंगामात टिकू शकला नाही. आयपीएल २०१५मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने युवराजला १६ कोटींना विकत घेतले होेते. यासह तो संपूर्ण हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, युवराजने या हंगामात १४ सामन्यात १९.०७च्या सरासरीने फक्त २४८ धावा केल्या होत्या.

३. जयदेव उनाडकट (राजस्थान रॉयल्स, २०१८) –

भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा २०१७मध्ये आयपीएलच्या राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. या हंगामात त्याने १२ सामन्यात २४ विकेट्स घेत सर्वांचे मन जिंकले होते. त्याच्या या उत्तम खेळीमुळे २०१८मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला सर्वाधिक ११.५ कोटी किंमतीला विकत घेतले होते.

परंतु, आयपीएलच्या ११व्या हंगामात सर्वात महागडा ठरलेला हा भारतीय खेळाडू १५ सामन्यात फक्त ११ विकेट्स घेऊ शकला होता. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट हा ९.६५ इतका होता. तरीही राजस्थान रॉयल्स संघ त्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला होता. पण यामध्ये उनाडकटचे जास्त योगदान नव्हते. म्हणून पुढील हंगामात त्याला संघातून बाहेर करण्यात आले.

ट्रेंडिंग लेख-

‘हे’ ४ गोलंदाज त्यांचे ‘ते’ षटक कधीच विसरणार नाहीत, ज्यात…

क्रिकेट जगतातील ४ ‘असे’ प्रसंग जिथे स्वत: क्रिकेटपटूंनी…

कसोटी क्रिकेटच्या एका डावात ‘या’ २ गोलंदाजांनी घेतल्या होत्या चक्क १०…


Previous Post

परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार

Next Post

IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Next Post

IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.