fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर

3 Ipl Players Played For Mumbai Indians And Chennai Super Kings

August 27, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांची चर्चा निघाली की, सर्वात पहिल्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या २ संघांची नावे घेतली जातात. विशेष म्हणजे, या दोन्ही टॉप संघांचे कर्णधार भारतीय खेळाडू आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे हे दोन्ही संघ आतापर्यंत ४वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. दरम्यान ३ वेळा मुंबईने बाजी मारली आहे, तर एकवेळा चेन्नईने मुंबईला पराभूत केले आहे.

तसं तर आपणा सर्वांना माहिती आहे की, आयपीएलमध्ये अनेक खेळाडू २ किंवा त्यापेक्षा जास्त संघांकडून खेळले आहेत. प्रत्येक हंगामातील आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंची एका संघातून दूसऱ्या संघात निवड होत असते. विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव असा खेळाडू आहे, जो आयपीएलच्या १२ हंगामात केवळ एका संघाकडून खेळला आहे.

या लेखात, आयपीएलच्या मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या त्या ३ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, जे आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहेत. तर बघूया, कोण आहेत ते ३ खेळाडू?

मुंबई इंडियन्सकडून खेळलेले ३ खेळाडू जे यंदा आहेत चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग (3 Ipl Players Played For Mumbai Indians And Chennai Super Kings) –

हरभजन सिंग – Harbhajan Singh

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा २००८पासून आयपीएलचा भाग आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये १६० सामने खेळले आहेत. दरम्यान तो आयपीएलच्या केवळ २ संघांकडून खेळला आहे. एक म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दूसरा म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (सीएसके).

२००८पासून ते २०१७पर्यंत हरभजन मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. दरम्यान त्याने १३६ सामने खेळत १२७ विकेट्स चटकावल्या होत्या. २०१८मध्ये त्याची चेन्नई सुपर किंग्समध्ये निवड झाली. पण चेन्नईतील आपल्या पहिल्या हंगामात हरभजन जास्त चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने पूर्ण हंगामात १३ सामने खेळत केवळ ७ विकेट्स घेतल्या. पण, आयपीएल २०१९मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केले आणि ११ सामन्यात १६ विकेट्स चटकावल्या. यंदा त्याचा सीएसकेकडून आयपीएलमध्ये खेळण्याचा तिसरा हंगाम असेल.

ड्वेन ब्रावो – Dwayne Bravo

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने मुंबई इंडियन्सचे ३ हंगामात प्रतिनिधित्त्व केले आहे. ब्रावोने मुंबई इंडियन्स संघाकडून २००८साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आयपीएल २०१०पर्यंत ब्रावोने मुंबईकडून ३० सामने खेळले होते. दरम्यान त्याने ४५७ धावा आणि २६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ब्रावो २०११ला चेन्नई सुपर किंग्स संघात सामील झाला. ब्रावोने सीएसकेकडून आतापर्यंत ८९ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ९२७ धावा आणि १०४ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे. तो आयपीएल २०२०मध्ये सीएसकेकडून दमदार प्रदर्शन करताना दिसेल.

अंबाती रायडू – Ambati Rayudu

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर एमएस धोनीच्या सीएसके संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूच्या नावाचा समावेश आहे. रायडूने २०१०मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, २०१८मध्ये त्याची सीएसके संघात निवड झाली. तेव्हापासून तो सीएसकेचा भाग आहे.

रायडूने सीएसकेकडून आतापर्यंत ३३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ८८४ धावा केल्या आहेत. तत्पुर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ११४ सामन्यात २४१६ धावा केल्या होत्या.

ट्रेंडिंग लेख –

कसोटी कारकिर्दीत दोन वेळा त्रिशतक करणारे फलंदाज

मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनच्या टॉप प्लेअर

२०२५मध्ये कोहली नव्हे तर ‘हा’ खेळाडू असणार भारतीय वनडे संघाचा कॅप्टन; इतर १० खेळाडूंची नावे घ्या जाणून

महत्त्वाच्या बातम्या –

निवृत्तीनंतर सुरेश रैना करणार हे काम ; जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना लिहिले पत्र

व्हिडिओ: पाकिस्तानच्या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर उगारली बॅट

कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित


Previous Post

वनडे रँकिंगमध्ये पुन्हा विराट-रोहितनेच मारली बाजी; तर टी२०मध्ये या भारतीय खेळाडूने टाकले फिंचला मागे

Next Post

ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली

द वॉलच्या मते रविंद्र जडेजाला फिल्डिंगमध्ये टक्कर देऊ शकणारा हा खेळाडू यंदा गाजवणार आयपीएल

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील या खेळाडूची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर; पुस्तक वाचनाचीही आहे आवड

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.