fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘या’ भारतीय खेळाडूंनी सलामीला फलंदाजी केली असती, तर लावला असता धावांचा रतीब

3 Middle Order Indian Batsman Can Make More Records If They Were Openers

क्रिकेटमध्ये फलंदाजांची ३ भागात विभागणी केली जाते. एक वरच्या फळीतले फलंदाज ज्यांना सलामीवीर फलंदाज असेही म्हणतात. दुसरे मधल्या फळीतील फलंदाज आणि तिसरे खालच्या फळीतील फलंदाज.

यामध्ये सलामीवीर फलंदाजांवर संघाच्या खेळाची पूर्ण जबाबदारी असते. सलामीला खेळणारा फलंदाज जेवढा चांगला खेळतो, तेवढा संघावरील दबाव कमी होतो आणि जिंकण्याच्या आशाही वाढू लागतात. तर, सलामीवीर फलंदाज कमी धावांवर बाद झाला तर उलट परिस्थिती उद्भवते. तसेच, सलामीला फलंदाजी केल्यामुळे जास्त वेळ खेळण्याची संधी मिळते आणि फलंदाजाला अधिकाधिक धावा करण्याची संधी मिळते.

जगातील अनेक सलामीवीर हे आधी मधल्या फळीतच खेळले परंतु योग्य संधी मिळाली व ते पुढे मोठे सलामीवीर झाले. अगदी सचिन तेंडूलकर किंवा रोहित शर्माचेच उदाहरण घ्या.

क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सईद अनवर, मॅथ्यू हेडन, ग्रीम स्मिथ असे जबरदस्त सलामीवीर फलंदाज होऊन गेले आहेत. तसेच, आताही असे अनेक फलंदाज आहेत. ज्यांनी सलामीला फलंदाजी करत अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावावर केलेली आहे. मात्र, भारतीय संघात असेही काही खेळाडू होऊन गेले जे या सलामीच्या स्थानापासून मुकले. नाही तर, त्यांनीही अनेक विक्रम आपल्या नावावर केले असते.

तर जाणून घेऊया त्या ३ भारतीय फलंदाजांविषयी 3 Middle Order Indian Batsman Can Make More Records If They Were Openers

३. सुरेश रैना

सुरेश रैना हा भारताचा मधल्या फळीतील जबरदस्त फलंदाज आहे. त्याने मधल्या फळीत ताबडतोब फलंदाजी करताना भारताला अनके सामने जिंकून दिले आहेत. त्याने वनडेत २२६ सामने खेळत ५६१५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी२०त त्याने ७८ सामन्यात १६०५ धावा आणि १८ कसोटी सामन्यात ७६८ धावा केल्या आहेत. त्याने जुलै २०१८मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

मात्र, जर रैनाला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर त्याचे कदाचित यापेक्षा जास्त धावा केल्या असत्या. त्याच्यात संघाला ताबडतोड सुुरुवात करुन देण्याची क्षमता होती. तो वनडेत अजून जास्त धावा करु शकला असता. तसेच अनेक विक्रमांची नोंदही त्याला करता आली असती.

२. अंबाती रायडू

अंबती रायडूमध्ये दमदार फलंदाजी करण्याची प्रतिभा होती. मात्र, त्याला त्यानुसार फलंदाजी करायला मिळाली नाही. जर त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती, तर कदाचित तो खूप धावा करु शकला असता. रायडूच्या आयपीएलमधील प्रदर्शनावरुनच त्याच्यातील क्षमता दिसून येते. त्याने आयपीएलमध्ये १४७ सामन्यात ३३०० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २०१८मधील सलामीला फलंदाजी करताना केलेल्या दमदार खेळींचा समावेश आहे.

शिवाय त्याने भारताकडून एकदा सलामीला फलंदाजी करताना ५७ धावांची खेळी होती. रायडूने आतापर्यंत ५५ वनडे सामन्यात ४४.०६च्या सरासरीने १६९४ धावा केल्या आहेत. त्याला नेहमी संघातून आत-बाहेर करावे लागले होते. त्याला सलग सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती, तर तो आज धावांच्या बाबतीत खूप पुढे असला असता. शिवाय, कदाचित त्याने अनेक विक्रम केले असते.

१. युवराज सिंग

युवराज सिंगने तसे तर मधल्या फळीत फलंदाजी करताना अनेक सामने भारताला जिंकून दिले होते. महत्त्वाचे म्हणजे, मधल्या फळीतील फलंदाजांचे नाव निघाले तर युवराज सिंगचे नाव आवर्जुन घेतले जाते. युवराजने वनडेत ३०४ सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत. तर, टी२०त ५८ सामन्यात ११७७ धावा आणि कसोटीत ४० सामन्यात १९०० धावा केल्या होत्या. या सर्व धावाही युवराजने मधल्या फळीत केल्या होत्या. यावरुन समजून येते की तो किती चांगला फलंदाज होता.

जर, युवराजला सलामीला फलंदाजी करायला मिळाली असती, तर कदाचित तो जगातील मोठा किर्तीमान स्थापित करणारा खेळाडू झाला असता.

ट्रेंडिंग लेख-

वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय…

८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील…

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

You might also like