fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

September 5, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे बरेच उत्कृष्ठ खेळाडू असतात आणि संघ त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो. काही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतात आणि काही फ्लॉप होतानाही दिसतात. कोणत्याही संघाचे यश आणि अपयश हे दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते.

क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. सामनावीर म्हणून सन्मान होणे ही प्रत्येक खेळाडूसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आयपीएलमध्येही प्रत्येक सामन्यानंतर एखाद्या खेळाडूला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार बर्‍याच वेळा विजय मिळवणाऱ्या संघाचे खेळाडू मिळवतात कारण त्यांनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केलेलं असते आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचललेला असतो.

या लेखामध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंचा उल्लेख आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळालेले खेळाडू

डेव्हिड वॉर्नर (David Warner) – १७ वेळा

सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने अनेक वेळा आयपीएलमध्ये उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याने आत्तापर्यंत १७ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये एक शतक आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. १४० च्या वर स्ट्राइक रेटने फलंदाजी करत तो कोणत्याही गोलंदाजाला हरविण्याची क्षमता ठेवतो. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये १२६ सामन्यात खेळताना ४७०० हून अधिक धावा केल्या आहेत. दबावामध्ये तो उत्तम खेळ करतो.

(आयपीएलमध्ये एमएस धोनी, शेन वॉट्सन आणि रोहित शर्मा यांना देखील १७ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. परंतु या सर्वांपेक्षा वॉर्नरने कमी सामने खेळले असल्याने त्याला या यादीत धोनी, रोहित आणि वॉट्सनच्या आधी स्थान देण्यात आले आहे.)

एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) – २० वेळा

दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने अनेक उत्तम डाव खेळले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत २० वेळा एबी डिव्हिलियर्सने सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. जलद फलंदाजी करून धावा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये ३ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची फटकेबाजी मैदानातील चारही बाजूला असते. त्याने आरसीबीकडून शानदार फलंदाजी केली आहे. त्याने आत्तापर्यंत १५४ सामन्यात ४३९५ धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल (Chris Gayle) – २१ वेळा

ख्रिस गेलच्या नावाचा समावेश जवळपास प्रत्येक आयपीएल रेकॉर्डमध्ये असतो. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत सर्वाधिक २१ वेळा आयपीएलमध्ये सामनावीराचा मान मिळवला आहे. ख्रिस गेलची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १७५ आहे आणि त्याने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकारही त्याच्याच नावावर आहेत. त्याने आयपीएलमध्ये १२५ सामन्यात ४४८४ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी

भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक

धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…

इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त


Previous Post

एका आयपीएल संघाचा मालक आहे पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तीचा पणतू

Next Post

आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत

Photo Courtesy: Twitter/ ICC

जगभरातील सर्वच कसोटी सामन्यात एकाच चेंडूचा वापर करावा; पहा कुणी केली मागणी

Photo Courtesy: Twitter/Cricketworldcup

या खेळाडूंच्या जर्सीवर दारूची जाहिरात पाहून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भडकले

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.