आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा पराभव केला आणि त्यांची चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी बीसीसीआय आणि सर्व फ्रेंचायझी तयारीला लागल्या आहेत. पुढच्या वर्षी दोन नवीन संघ स्पर्धेत सामील होणार असून, यासाठी २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सामील होणार असून, प्रत्येक फ्रेंचायझी त्यांना स्वतःच्या संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असेल. सनरायझर्स हैदराबाद संघ पुढच्या हंगामात नवीन कर्णधाराच्या शोधात असू शकतो.
सनरायझर्स हैदरानाबादने यावर्षी डेविड वार्नरला संघाच्या खराब प्रदर्शनामुळे कर्णधापदावरून हटविले गेले. त्याच्या जागी केन विलियम्सनने नेतृत्व स्वीकारले, पण त्याचा देखील संघाला काही खास फायदा झाला नाही. वॉर्नरला या संपूर्ण हंगामात खराब वागणूक मिळाल्यामुळे तो आता पुढच्या वर्षी मेगा लिलावात सहभागी होणार आहे.
पुढच्या वर्ष प्रत्येक फ्रेंचायझी केवळ चार खेळाडूंना संघाात कायम ठेवू शकणार आहे, ज्यामध्ये दोन खेळाडू विदेशी असतील. अशात संघ शक्यतो राशिद खान आणि अजून एका विदेशी खेळाडूला कायम ठेवू शकतो. अशात केन विलियम्सनचे यावर्षीचे प्रदर्शन पाहता त्याला संघ पुढच्या हंगामात कायम ठेवेल याची खूपच कमी शक्यता आहे. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे पुढच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना दिसू शकतात.
श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यरने २०१८ मध्ये पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व स्विकारले होते. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दोन वर्ष चांगले प्रदर्शन केले. त्याच्या नेतृत्वात संघाने मोठ्या काळानंतर प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आणि त्याच्या पुढच्या हंगामात थेट अंतिम सामन्यापर्यंत झेप घेतली. मात्र, २०२१ हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. अशात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रिषभ पंतला दिली गेली होती. २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अय्यरने संघात पुनरागमन केले, पण त्याला कर्णधारपद परत मिळाले नाही. अशात दिल्ली कॅपिटल्सने जर पुढच्या हंगामात अय्यरला संघात कायम ठेवले नाही, तर हैदराबाद फ्रेंचायझी त्याला स्वतःच्या संघात घेण्याच्या प्रयत्नात असेल. जर अय्यर संघात आला तर त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
केएल राहुल
केएल राहुल मागच्या दोन वर्षांपासून पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, यावर्षीचा हंगाम संपल्यानंतर तो संघाची साध सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पंजाब किंग्स संघाचे मालक नेस वाडियांना काही दिवसांपूर्वी राहुलविषयी प्रश्न विचारला गेला होता, पण त्यांनी या प्रश्नावर व्यवस्थित उत्तर दिले नव्हते, ज्यानंतर या चर्चांना जास्त उधाण आले आहे. राहुल कर्णधाराच्या रूपात जास्त यशस्वी ठरला नसला तरी, त्याचे वैयक्तिक प्रदर्शन खूपच उत्कृष्ट राहिले आहे. त्याने मागच्या दोन्ही हंगामांमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशात राहुल जर मेगा लिलावात सहभागी झाला, तर सनरायझर्स हैदराबाद संघ त्याच्यावर बोली लावू शकतो.
स्टीव स्मिथ
या यादीत तिसरे नाव ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथचे आहे. स्मिथने आयपीएलमध्ये यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते आणि मागच्या दोन वर्षांपासून तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. दिल्लीमधून स्मिथला अपेक्षित जास्त संधी मिळाल्या नाहीत. असे सांगितले जात आहे की, दिल्ली संघ पुढच्या हंगामात कगिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्किए या दोन विदेशी खेळाडूंना कायम ठेवणार आहे. अशात जर स्मिथ मेगा लिलावात सामील झाला, तर सनरायझर्स हैदराबाद त्याला मोठी किंमत मोजून स्वतःच्या संघात सामील करू इच्छित असेल.