इंडियन प्रीमियर लीग मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचे दमदार प्रदर्शन राहिले आहे. सीएसकेने खेळलेल्या आयपीएलच्या १० हंगामात त्यांनी प्रत्येकवेळी प्लेऑफपर्यंतचा प्रवास गाठला आहे. तर त्यातील ८ वेळा त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८ आणि २०१९ या ८ हंगामात सीएसके अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी त्यांनी ३ वेळा अंतिम सामना जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यावरुन कळून येते की, सीएसकेची आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये गणना का केली जाते?
तसं सीएसकेच्या या यशामागे संघाचा कर्णधार एमएस धोनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पण, संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीशिवाय हे शक्य नव्हते. पण, आयपीएलच्या तेराव्या हंगामात या संघापुढे अनेक मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे या हंगामातील प्रदर्शन कसे राहिलं याची सर्वांना चिंता लागली आहे.
या लेखात, त्या ३ कारणांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यामुळे सीएसके आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघर्ष करताना दिसेल. 3 Reason Why Chennai Super Kings Would Struggle In IPL 2020
तर जाणून घेऊयात…
भारतीय वेगवान गोलंदाजी बॅकअपची कमतरता
गेल्या २ हंगामांपासून भारताचा मध्यमगती गोलंदाज दीपक चाहर सीएसकेकडून चांगले प्रदर्शन करत आहे. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारताकडून जेव्हा जेव्हा खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने दमदार प्रदर्शन केले आहे. तर, दूसऱ्या बाजूला भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर हा त्याच्या टी२० क्रिकेटमधील प्रदर्शनामुळे संघर्ष करताना दिसला आहे.
शार्दुल हा देखील आयपीएलच्या तेराव्या हंगामात सीएसकेचा भाग आहे. जर, या दोन्ही गोलंदाजांपैकी एका जरी गोलंदाजाला कोणत्याही कारणामुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर रहावे लागले. तर सीएसकेकडे वेगवान गोलंदाजीसाठी भारतीय गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध नाही.
संघातील मुख्य खेळाडू आहेत टी२० क्रिकेटपासून दूर
सीएसकेमधील एमएस धोनी आणि शेन वॉटसन हे दोन्ही मुख्य खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू आहेत. धोनीने जुलै २०१९पासून कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळलेला नाही. तसेच वॉट्सनही बऱ्याच दिवसापासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे सीएसकेमधील हे दोन्ही मुख्य खेळाडू बऱ्याच काळापासून टी२० क्रिकेटपासून दूर आहेत. त्यामुळे या २ मुख्य खेळाडूंचे प्रदर्शन चांगले न राहिल्यास सीएसकेला अडचण होऊ शकते.
सुरेश रैना संघातून बाहेर
सीएसकेसमोरील सर्वात मोठी समस्या हा सुरेश रैना आहे. कारण, रैना हा संघाचा प्रमुख फलंदाज आहे आणि तो वैयक्तिक कारणामुळे युएईवरुन भारतात परतला आहे. तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळणार नाही. म्हणून रैनाच्या ठिकाणी त्याच्या इतक्या दमदार खेळाडूला निवडणे हे खूप कठीण काम आहे.
रैना फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही माहीर होता. त्याच्या आयपीएलमध्ये न खेळण्यामुळे संघाला मोठे नुकसान झाले आहे. जर यंदा सीएसकेचे प्रदर्शन खराब राहिल्यास, रैनाचे संघाबाहेर होणे हे त्यामागील प्रमुख कारण ठरु शकते.
ट्रेंडिंग लेख –
टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून
तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा
बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त ४२ डावात मिळवला अव्वल नंबर; भारताच्या या दिग्गजाने केला होता हा पराक्रम
तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया