fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एक नकोसा तर दोन हवेहवेसे विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रविडच्या नावावर, मोडणे आहेत केवळ अशक्य

3 Records Of Rahul Dravid In Test Cricket Which Were Unbroken

‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड याने भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. द्रविड त्याच्या काळातील कसोटीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होता. त्याने कसोटीत १६४ सामन्यात १३२८८ धावा केल्या होत्या. शिवाय वनडेतही त्याने ३४४ सामन्यात १०८८९ धावा केल्या होत्या.

दरम्यान आपल्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत द्रविडने अनेक विक्रमांचा रतीब घातला आहे. असेही काही विक्रम त्याने केले होते. जे आजवर कोणत्याही फलंदाजाला मोडता आले नाहीत.

या लेखात द्रविडच्या त्या अनोख्या ३ विक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे. तर जाणून घेऊया, त्या विक्रमांविषयी- 3 Records Of Rahul Dravid In Test Cricket Which Were Unbroken

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल

द्रविड हा फक्त शानदार फलंदाज नव्हता, तर तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील होता. १९९६-२०१२ दरम्यान द्रविडने १६४ कसोटी सामने खेळत एकूण २१० झेल पकडले होते. तो कसोटीत जगातील सर्वाधिक झेल पकडणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या व्यतिरिक्त फक्त माहेला जयवर्धने (२०५) आणि जॅक्स कॅलिस (२००) यांनी २००पेक्षा जास्त झेल झेलले आहेत. विशेष म्हणजे, कसोटीत २००पेक्षा जास्त झेल झेलणारा द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

त्याच्यानंतर अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, ते या यादीत आहेत. मात्र, सध्या भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंपैकी विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ८२ झेल पकडले आहेत. त्यामुळे विराटला द्रविडचा विक्रम मोडणे जवळपास अशक्य गोष्ट आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना

द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १३ हजारपेक्षाही जास्त धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने ३१२५८ चेंडूंचा सामना केला होता. द्रविड हा कसोटीत ३० हजारपेक्षा जास्त चेंडू खेळणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्यानंतर या यादीत सचिन तेंडुलकर २९४३७ चेंडूंचा सामना करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकाचा फलंदाज जॅक्स कॅलिस, वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍलन बॉर्डर हे टॉप-५मध्ये आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा त्रिफळाचीत होण्याचा नकोसा विक्रमदेखील द्रविडच्या नावावर आहे. कसोटीत ५२वेळा त्रिफळाचीत होणारा तो भारतातील पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त सचिन हा कसोटीत सर्वाधिक ४८वेळा त्रिफळाचीत होत भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत होणारा जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ऑस्ट्रेलियाचा ऍलन बॉर्डर हा आहे. तो कसोटीत ५३वेळा त्रिफळाचीत झाला आहे.

ट्रेंडिंग लेख-

जगातील ५ असे महान क्रिकेटर, जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत

विश्वचषकात खेळलेल्या ११ महान खेळाडूंचा संघ, दोन नावे आहेत भारतीय

टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारे जगातील ५ फलंदाज, पहा किती आहे…

You might also like