fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे ‘विराट’ विक्रम

3 Records That Virat Kohli May Do In This IPL

August 28, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

विराट कोहली एक दमदार कर्णधार असण्याबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाजदेखील आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दोन्हीमध्येही शानदार विक्रमांची नोंद केली आहे. गेल्या १२ आयपीएल हंगामापासून विराट आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

पण, दुर्दैवाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी)च्या या कर्णधाराला आपल्या संघाला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकवून देता आली नाही. असे असले तरी, आरसीबीचे आणि विराटचे आयपीएलमधील प्रदर्शन नेहमीच दमदार राहिले आहे. विराटने आयपीएलमध्ये अनेक अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएल २०२०मध्येही तो ३ शानदार विक्रम आपल्या नावावर करु शकतो. या लेखात, त्या ३ विक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे.

आयपीएल २०२०मध्ये विराट करणारे हे तीन विक्रम (3 Records That Virat Kohli May Do In This IPL) –

आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळा ५०पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३६वेळा ५०किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दरम्यान विरुद्ध संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने १६वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण, या यादीत भारतीय दिग्गज गौतम गंभीर विराटच्या पुढे आहे. गंभीरने आव्हानाचा पाठलाग करताना २०वेळा ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

त्यामुळे विराटला आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी अजून ५ अर्धशतकांची गरज आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात तो हा कारनामा करु शकतो.

सर्वाधिक आयपीएल शतक करणारा फलंदाज

आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ वेळा शतक ठोकले आहे. याबाबतीत विराट गेलच्या मागे आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ शतके केली आहेत.

त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये १ किंवा त्यापेक्षा जास्त शतक करत विराट गेलच्या पुढे जाऊ शकतो. आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरु शकतो. पण, हा विक्रम आपल्या नावावर करणे विराटने थोडे अवघड जाणार आहे. कारण ख्रिस गेलदेखील आयपीएल २०२०चा भाग आहे.

सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करणारा खेळाडू 

विराटने आयपीएल २००८ पासून ते आयपीएल २०१९ पर्यंत एकूण १७७ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५४१२ धावा केल्या आहेत. जर विराटचा फॉर्म आयपीएलच्या तेराव्या हंगामात दमदार राहिला तर तो ६००० धावांचा आकडा गाठू शकतो. यासह विराट आयपीएल इतिहासात सर्वात जलद ६००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरु शकतो.

विराटपाठोपाठ आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैना दूसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर ५३६८ धावा केल्या आहेत. त्यामुळे रैनालाही हा विक्रम करण्याची संधी आहे.

ट्रेंडिंग लेख –

मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप

लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश

‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?

महत्त्वाच्या बातम्या –

बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर

आजपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु होणाऱ्या टी२० मालिकेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

विराट कोहली बाप होणार असल्याची बातमी कळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची उडाली झोप


Previous Post

मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

आश्चर्यम! खेळाडूने षटकार ठोकून स्वतःच्या कारच्या फोडल्या काचा

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड

April 20, 2021
Next Post

आश्चर्यम! खेळाडूने षटकार ठोकून स्वतःच्या कारच्या फोडल्या काचा

बॅडमिंटन खेळाडूंसाठी वाईट बातमी; या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या रद्द

क्रिकेटच्या काळ्या अध्यायाची दशकपूर्ती: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.