आयपीएल 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. या लिलावात सर्व 10 संघांनी आगामी आयपीएल हंगामासाठी तगड्या खेळाडूंची निवड केली. यावेळी मेगा लिलावात रिषभ पंत (Rishabh Pant) सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) 27 कोटींना विकत घेतले. तत्पूर्वी जर आपण सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडूं कोणत्या संघात आहेत, त्याबद्दल बोललो तर पंजाब किंग्ज (PBKS), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्सची (GT) नावे सर्वात वर येतील.
सनरायझर्स हैदराबादचा (SRH) संघ आगामी आयपीएलमध्ये खूप मजबूत दिसत आहे. त्याच्याकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर हैदराबादकडे असे 5 खेळाडू आहेत. त्यामध्ये अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षल पटेल आहेत. तर फलंदाजीत हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन हे स्टार खेळाडू आहेत.
पंजाब किंग्ज (PBKS) संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे एकूण 9 अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामध्ये 4 खेळाडू अतिशय धोकादायक आहेत. पंजाबने मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेलला संघात सामील केले आहे. हरप्रीत ब्रार पंजाबचा हा मजबूत खेळाडू आहे. त्याने स्वत:ला सिद्धही केले आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. मार्को जॅन्सन, अजमतुल्ला उमरझाई हे खेळाडू देखील खेळाला कलाटणी देण्यात पटाईत आहेत.
गुजरात टायटन्सकडेही (GT) 9 अष्टपैलू खेळाडू आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. सुंदरने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने भारतीय संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निशांत संथू, महिपाल लोमरोर, साई किशोर, साई सुदर्शन आणि करीम जनत हे संघासाठी महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेनने जेतेपद पटाकावून रचला इतिहास…!
विराटने कर्णधार पदासाठी नकार दिल्यास, कोण असणार RCBचा कर्णधार?
क्रेग ब्रेथवेटने रचला इतिहास! ‘या’ दिग्गजाला टाकले मागे