आयपीएलमध्ये दरवर्षी कित्येक नवे आणि जुने खेळाडू येतात आणि त्यांच्या दमदार प्रदर्शनाने अनेक वर्षे आयपीएलचा भाग बनून राहतात. याउलट काही खेळाडूंना त्यांच्या प्रदर्शानमुळे पहिल्याच हंगामात बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि दुर्दैवाने त्यांना पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. वेस्ट इंडिज संघातील ३ खेळाडूंसोबतही असेच घडले आहे.
तसं तर, वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना त्यांच्या आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखले जाते. आयपीएलव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल), पाकिस्तान सुपर लीग अशा वेगवेगळ्या २० षटकांच्या क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांना सहसा ताबडतोब प्रदर्शन करण्याचा अनुभव असतो. पण वेस्ट इंडिज संघात असेही काही खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांना अपेक्षेप्रमाणे २० षटकांच्या कोणत्याही क्रिकेट स्वरुपात चांगली कामगिरी करता आली नाही.
या लेखात, अशाच ३ वेस्ट इंडिज खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, जे आयपीएलच्या केवळ एका हंगामात खेळू शकले (3 West Indies Players Who Played In Only One IPL Season)
रामनरेश सरवन – Ramnaresh Sarwan
वेस्ट इंडिजचा वरच्या फळीतील माजी फलंदाज रामनरेश सरवन याने २००८साली किंग्स इलेव्हन पंजाब संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. दरम्यान त्याने ४ सामने खेळत १८.२५च्या सरासरीने ७३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक ३१ धावांचा समावेश होता.
रामनरेशला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही जास्त संधी मिळाली नाही. त्यानने वेस्ट इंडिजकडून केवळ १८ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २९८ धावा केल्या होत्या.
फिडेल एडवर्ड्स – Fidel Edwards
वेस्ट इंडिजचा हा वेगवान गोलंदाज आयपीएलच्या दूसऱ्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. १९ एप्रिल २००९रोजी त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याने पूर्ण हंगामात एकूण ६ सामने खेळले आणि केवळ ५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. पुढे त्याला कधीही आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही.
एड्रियन बारथ -Adrian Barath
केवळ ३ वर्षे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा भाग असणारा एड्रियन बारथ, याचा त्या वेस्ट इंडिज खेळाडूंच्या यादीत समावेश होतो, जे केवळ एका हंगामात आयपीएलचा भाग होते. १९ मार्च २०१०रोजी डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या सामन्यातून बारथने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने आपल्या सामन्यात फक्त ७ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने केवळ २ सामने खेळले. त्यात त्याने ३५ धावा केल्या. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला पुढे कधीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
ट्रेंडिंग लेख –
ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली
कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर
ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील या खेळाडूची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर; पुस्तक वाचनाचीही आहे आवड
द वॉलच्या मते रविंद्र जडेजाला फिल्डिंगमध्ये टक्कर देऊ शकणारा हा खेळाडू यंदा गाजवणार आयपीएल
वनडे रँकिंगमध्ये पुन्हा विराट-रोहितनेच मारली बाजी; तर टी२०मध्ये या भारतीय खेळाडूने टाकले फिंचला मागे