पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात आशिया चषक 2023चा पहिला सामना खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी वैयक्तिक शतके ठोकत संघाची धावसंख्या उंचावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने 50 षटकांमध्ये 6 बाद 342 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानसाठी बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावा केल्या. त्याचसोबत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इफ्तिखार अहमद याने 71 चेंडूत 109 धावांची खेली केली. दुसरीकडे नेपाळ संघासाठी आशिया चषकातील हा पहिलाच सामना आहे. अशात या नवख्या संघापुढे पाकिस्तानने ठेवलेले धावांचे लक्ष्य नक्कीच सोपे नाही. बाबरने या सामन्यात केलेले शतक 109 चेंडूत, तर इफ्तिखार अहमदने 67 चेंडूत शतक ठोकले. इफ्तिखारच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिलेच शतक ठरले.
दरम्यान, पाकिस्तानच्या डावाचा एकंदरीत विचार केला, तर सलामीवीर फखर झमान (14) आणि इमाम उल हक (5) स्वस्तात बाद झाले. कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या दोन विकेट्सनंतर पाकिस्तानचा डाव संभाळला. रिझवान 50 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला आगा सलमान हादेखील अवघ्या 5 धावा करून बाद झाला. मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना इफ्तिखार अहमद यायने पाकिस्तानची धावसंख्या वेगाने उंचावली. त्याने 153.52च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
नेपाळच्या गोलंदाजी आक्रमाणाचा विचार केला, तर सोमपाल कामी याने 10 षटकात दोन विकेट्स घेतल्या, पण यादरम्यान तब्बल 85 धावाही खर्च केल्या. करन केसी याने 9 षटकात 54 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. तसेच संदीप लामीचाना याने 10 षटकांमध्ये 69 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. (343-run target against debutant Nepal in Asia Cup, Babar and Iftikhar’s stormy century for Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
रोहितने सांगितले कारण, का तो खेळत नाहिये मोठी खेळी म्हणाला, मी 170 धावा…