fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६ दिवसांऐवजी फक्त दिड दिवस राहणार इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू क्वारंटाइन?

September 18, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडहून येणाऱ्या २१ खेळाडूंना ६ दिवसांऐवजी केवळ ३६ तासांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे. ज्या फ्रँचायझी संघात इग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. त्या सर्वांनी इंग्लंडहून मर्यादित षटकांच्या मालिका खेळून परतणार्‍या खेळाडूंसाठी क्वारंटाइन कालावधी कमी करण्याची अपील केली आहे. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीच्या संबंधित विभागांसमवेत समस्यांचे निराकरण केले आहे.

आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, “होय, मी याची पुष्टी करू शकतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील सर्व खेळाडू सहा दिवसांऐवजी केवळ ३६ तास क्वारंटाईन ठेवण्यात येतील, हा प्रश्न सोडवला गेला आहे आणि बर्‍याच संघांचे अव्वल खेळाडू पहिल्या सामन्यापासूनच उपलब्ध होतील.”

डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर हे खेळाडू गुरुवारी रात्री युएईमध्ये दाखल झाले आणि आगमन झाल्यानंतर त्याची आरटी-पीसीआरवर चाचणी झाली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात चढण्यापूर्वीही त्यांची चाचणी घेण्यात आली. यावेळी कठोर चाचणी प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. या निर्णयामागील तर्क हा आहे की खेळाडू एका जैव-सुरक्षित वातावरणातून दुसर्‍या वातावरणात प्रवेश करीत आहेत.

याआधी ऑस्ट्रेलियाच्या एका वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहून सहाऐवजी तीन दिवसांसाठी क्वारटाईन ठेवण्याची विनंती केली होती. याबाबतीत बीसीसीआयने तीन फ्रँचायझी अधीकाऱ्यांशी बोलणे केले, असून ते या निर्णयामुळे खूश दिसत आहेत.

एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीसीआयने ३६ तास क्वारंटाइन ठेवण्याचा कालावधी करून खूप चांगले काम केले आहे.” म्हणजे पहिल्याच सामन्यापासून चेन्नई सुपर किंग्ज (जोश हेजलवुड आणि सॅम करन), राजस्थान रॉयल्ससाठी (स्मिथ, बटलर, टॉम करन आणि आर्चर) हे खेळाडू उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ग्लेन मॅक्सवेल आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी अ‍ॅलेक्स कॅरी पहिल्या सामन्यात खेळू शकतील.”

कोलकाता नाईट रायडर्स ही एकमेव फ्रेंचायझी आहे, ती ६ दिवस खेळाडूंना क्वारंटाइन ठेवण्यावर खुश नव्हते. कारण त्यांचा पहिला सामना २३ सप्टेंबरला आहे. त्याच्या संघात इयन मॉर्गन, टॉम बँटोम आणि पॅट कमिन्स यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.


Previous Post

हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई

Next Post

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू किती कमाई करतात एकदा पहाच…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/Mipaltan

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू किती कमाई करतात एकदा पहाच...

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळवून देऊ शकतात पहिले आयपीएल विजेतेपद

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

हा कर्णधार म्हणतो, संघ व्यवस्थापनाच्या आवडीनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.