इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांच्या अगोदर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप कष्ट घेत आहे. मागील काही दिवसांमध्ये धोनीने आपले वजन देखील काम केले आहे आणि तो आता बारीक दिसत आहे. धोनीच्या या नवीन लूकचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने याच महिन्यात 7 तारखेला आपला 40 वा वाढदिवस साजरा केला आहे. 40 वय असुनही धोनी अजूनही तंदुरुस्तीच्या बाबत युवा खेळाडूंना टक्कर देत आहे. तो नेहमीच धावा घेण्यासाठी क्रिजवर वेगाने पळतो. सोबतच तो एक उत्साही यष्टीरक्षक देखील आहे.
महेंद्रसिंग धोनीला 1 दिवसापूर्वीच मुंबई येथील विमानतळावर पाहण्यात आले होते. खरंतर धोनी हा गायक राहुल वैद्य यांच्या लग्नामध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे तो मुबंई विमानतळावर दिसला होता.
https://www.instagram.com/p/CRYMHPDA58c/?utm_source=ig_web_button_share_sheet
तसेच काही दिवसांपूर्वी धोनीने आपला 40 वा वाढदिवस आपला परिवार आणि मित्रांसोबत रांची येथील फार्म हाऊसवर साजरा केला होता. यावेळी धोनीच्या मित्रांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएल 2021 ला 29 सामन्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे धोनी रांची येथील आपल्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसून आला होता. याच दरम्यानचा एक व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षी हिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामध्ये धोनी आपला घोडा पोनीसोबत शर्यत लावताना दिसून आला होता. यावरुन त्याच्या तंदुरुस्तीचा अंदाज येतो.
महेंद्रसिंग धोनीने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे धोनी आता केवळ आयपीएलच्या सामन्यांदरम्यानच मैदानावर दिसतो आहे. त्याने धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व करत 332 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जो एक जागतिक विक्रम देखील आहे. 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 178 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर 120 सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर 15 सामने अनिर्णित ठरले आणि 6 सामने बरोबरीत सुटला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जवळजवळ 53 टक्क्यांपेक्षाही जास्त सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात! सबस्टीट्यूट यष्टीरक्षकाने मागे वळून न पाहताही उडवली दांडी, झाली धोनीची आठवण
यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकचा धोनी-संगकाराच्या मांदियाळीत प्रवेश, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी
विंडीजचा ‘हा’ सलामीवीर बनला टी२०तील ‘नवा सिक्सर किंग’, फिंच-गेलही त्याच्यापुढे फेल