आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट म्हटले की, पाहायला मिळतात ते फलंदाजांनी एका-नंतर-एक मारलेले षटकार आणि चौकार. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला सिक्सर किंग म्हटले जाते. परंतु, भारताच्या हिटमॅन रोहित शर्माने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेललाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. शिवाय टी२०त १००पेक्षा जास्त षटकार मारणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
रोहितनंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (११९), कॉलिन मुनरो (१०७), वेस्ट इंडिजचा गेल (१०५) आणि इंग्लंडचा इयॉन मॉर्गन (१०५) हे आहेत. या सर्वांनी १००पेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
या लेखात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ५ भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर जाणून घेऊया कोण आहेत ते फलंदाज- 5 Indian Batsman Who Hit Most Sixes In T20I
५. सुरेश रैना (५८ षटकार)
भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा टी२०त सर्वाधिक षटकार मारणारा ५वा भारतीय फलंदाज आहे. त्याने ७८ टी२० सामन्यात ५८ षटकार मारले आहेत. आपल्या टी२० कारकिर्दीत त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने १६०४ धावा केल्या आहेत. शिवाय, टी२०मध्ये सर्वात पर्रथम शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याने २०१०मधील टी२० विश्वचषकात दक्षिण आप्रिकाविरुद्ध हे ऐतिहासिक शतक मारले होते.
४. केएल राहुल (६१ षटकार)
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने भारताकडून ४२ टी२० सामने खेळत ६१ षटकार मारले आहेत. यासह तो टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच, राहुलने त्याच्या टी२० कारकिर्दीत २ शतके आणि ११ अर्धशतके करत १४६१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ११० धावांचा समावेश आहे. शिवाय राहुल हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ६वा भारतीय खेळाडू आहे.
३. युवराज सिंग (७४ षटकार)
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज याच्या नावावर अनेक फलंदाजी विक्रम आहेत. तो टी२० विश्वचषकात ६ चेंडूत सलग ६ षटकार मारण्याचा त्याने कारनामा केला होता. २००७सालच्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात त्याने हा पराक्रम केला होता. युवराज हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत ५८ सामन्यात ७४ षटकार मारले होते. तसेच त्याने टी२०त ८ अर्धशतकांसह ११७७ धावा केल्या आहेत.
२. विराट कोहली (७६ षटकार)
भारताचा कर्णधार विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्याने टी२०मध्ये ८१ सामन्यात ७६ षटकार मारले आहेत. कोहलीने आतापर्यंत त्याच्या टी२० कारकिर्दीत २४ अर्धशतकांसह २७९४ धावा केल्या आहेत. त्याच्या सर्वाधिक धावा या नाबाद ९४ इतक्या आहेत. विशेष म्हणजे, टी२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे.
१. रोहित शर्मा (१२७ षटकार)
भारताचा हिटमॅन रोहित शर्माला मर्यादित षटकांचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले जाते. त्याच्या नावार टी२०त सर्वाधिक ४ शतके करण्याचा विश्वविक्रम नोंदलेला आहे. रोहित त्याच्या १०८ टी२० सामन्यात १२७ षटकार ठोकत जगातील आणि भारतातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने त्याच्या टी२० कारिकिर्दीत २१ अर्धशतकांसह २७७३ धावा केल्या आहेत. तसेच तो टी२० क्रिकेटमद्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज
खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर
क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा…