fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संघासाठी वाट्टेल ते! संघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारे ५ निस्वार्थी भारतीय महारथी

5 indian players who sacrificed

August 8, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

खेळाडूंची फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेला हातभार लागला आहे. एक वेगळीच रंजक या खेळात आहे. सध्या टी-२० सह वनडे आणि कसोटी क्रिकेटही लोक पाहतात. वेगवेगळ्या खेळाडूंनी यात उत्तम कामगिरी केली आहे.

तसे, भारतीय क्रिकेट इतिहासात बरेच महान खेळाडू होऊन गेले आहेत. ज्यांनी जबरदस्त शतके ठोकली आहेत तसेच गोलंदाजीतही कमाल केली आहे. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जगभर प्रसिद्धी मिळाली आहे परंतू वेगवान गोलंदाजी ही भारताची नेहमीच दुबळी बाजू राहिली आहे.

बर्‍याच भारतीय खेळाडूंनीही आपल्या काळात अशीच क्रीडा कौशल्य दाखवली. असे म्हणतात की फलंदाजाला त्याच्या ठरलेल्या स्थानावर फलंदाजी करायला आवडते. तो कोणत्याही किंमतीत ते स्थान सोडत नाही. परंतु, भारतीय संघात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या स्थानापेक्षा संघाची गरज काय याला अधिक पसंती दिली आहे.

म्हणूनच या लेखात तुम्हाला भारतातील ५ सर्वात निस्वार्थ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी देशाच्या हितासाठी कायम फलंदाजीच्या स्थानाशी तडजोड केली आहे.

५. सुरेश रैना (Suresh Raina)
भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत सुरेश रैनाने चौथ्या क्रमांकाच्या स्थानावर बरेच यश मिळवले आहे. परंतु, रैनाला नेहमीच तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज बनायचे होते. २०१६ च्या मुलाखतीत रैनाने हे स्पष्ट केले की त्याने तिसर्‍या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, परंतु संघाच्या गरजेमुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता.

आयपीएलमध्ये सर्वप्रथम ५००० धावा पूर्ण करणारा सुरेश रैना, हा एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज होता आणि धोनीच्या नेतृत्वात संघानेही त्याच्यावर बराच विश्वास व्यक्त केला. जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धचा अखेरचा आंतरराष्ट्रीय  सामना खेळल्यानंतर सुरेश रैना गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.
या वर्षाच्या अखेरीस वर्ल्ड टी-२० साठी निवड समितीच्या नजरेत जर त्याला राहायचे असेल तर त्याला या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करावी लागेल.

४. एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एमएस धोनीने आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने भारतीय संघाला वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकावरही नेले. धोनी केवळ सर्वोत्कृष्ट कर्णधारच नाही तर एक उत्तम फलंदाजही आहे.

एमएस धोनी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निस्वार्थी खेळाडूंपैकी एक आहे. धोनीला पहिल्या ४ मध्ये फलंदाजी करण्याची आणि भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज होण्याची संधी होती. परंतु, त्याने खालच्या क्रमात राहून तरुणांना प्राधान्य दिले.
धोनीने स्वबळावर भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत धोनी भारत आणि आशिया इलेव्हनकडून खेळला आहे. त्याने ५३८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १५,००० हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, धोनीनेही १६ शतके ठोकली आहेत. धोनीने कसोटीत ६ शतके आणि वनडेमध्ये १० शतके ठोकली आहेत.

३. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)
व्हीव्हीएस लक्ष्मण हा अनेक वर्षांपर्यंत भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य घटक होता. लक्ष्मणने अनेक वेळा कसोटी क्रिकेटमधील पराभवापासून भारतीय संघाला वाचवले आहे. आपल्या शास्त्रशुद्ध फलंदाजीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनेक वेळा वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट डाव खेळले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात लक्ष्मणने २८१ धावांची खेळी केली. दुर्दैवाने या अनुभवी व्यक्तीला कधीच भारतीय संघाकडून विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. या अनुभवी खेळाडूने २०१२ मध्ये न्यूझीलंड मालिकेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
मालिका संपल्यानंतर बीसीसीआयने त्याला निवृत्ती न घेण्याची ऑफर दिली असली, तरी लक्ष्मणने लवकरच युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

२. राहुल द्रविड (Rahul Dravid)
भारतीय क्रिकेट संघाचा एक महान फलंदाज राहुल द्रविडनेदेखील आपल्या कारकिर्दीतील कसोटीसह वनडे सामन्यातही शानदार प्रदर्शन केले आहे. राहुल द्रविड देखील व्हीव्हीएससारखा निस्वार्थ फलंदाज आहे ज्याने तरुणांना संधी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकाली निवृत्तीची घोषणा केली होती.
वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात राहुल द्रविडने ३४४ सामन्यात १२ शतके आणि ८३ अर्धशतकांच्या १०८९९ धावा केल्या आणि जगातील सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो दहाव्या क्रमांकावर आहे. याशिवाय राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये ३६ शतके केली आहेत आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय शतकांची एकूण संख्या ४८ आहे.
वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात राहुल द्रविडने एकदा १५० चा टप्पा ओलांडला आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या १५३ अशी आहे. चार वनडे सामन्यांत द्रविड देखील नर्व्हस नाइनटीजचा शिकार झाला आहे.

१. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सौरव गांगुली पहिल्या क्रमांकावर आहे. कारण वीरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनीसाठी फलंदाजीच्या क्रमवारीतील आपले स्थान दिले. सेहवागने एका मुलाखतीत सांगितले की, “गांगुली कर्णधारांपैकी एक होता ज्याने धोनी आणि मला चांगली फलंदाजी करता यावी यासाठी स्वतः खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आला.”
सौरव गांगुलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत शानदार प्रदर्शन केले. वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सौरव गांगुलीने ३११ सामन्यांच्या ३०० डावांमध्ये २२ शतके आणि ७२ अर्धशतकांसह ११३६३ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा काढण्यात तो जगात नववा आहे.
सौरव गांगुलीनेही कसोटी क्रिकेटमध्ये १६ शतके ठोकली आहेत आणि अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय शतकांची त्यांची संख्या ३८ आहे. वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सौरव गांगुलीनेही दोनदा १५० चा आकडा पार केला असून १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.


Previous Post

भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिले जात असलेले ५ युवा क्रिकेटर आयपीएल गाजवणार?

Next Post

खरे अष्टपैलू! वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा व १०० विकेट्स घेणारे भारतीय महारथी…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
Next Post

खरे अष्टपैलू! वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा व १०० विकेट्स घेणारे भारतीय महारथी...

सलग १००पेक्षाही जास्त वनडे सामने खेळणारे ३ भारतीय लीजंड्स

जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.