आपणा सर्वांना माहिती आहे की, क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. पण, जसजशी वेळ बदलत गेली, तस तसे क्रिकेटमधील बऱ्याच गोष्टीही बदलल्या. क्रिकेटमध्ये अनेक नव्या गोष्टींची भर पडली, ज्यातील काही गोष्टींमुळे क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हणणे थोडेसे चुकीचेच ठरेल.
‘स्लेजिंग’ म्हणजे खेळताना विरुद्ध संघातील खेळाडूंना अपशब्द वापरुन हिनवणे. स्लेजिंग या नव्या गोष्टीची क्रिकेटमध्ये भर पडल्यामुळे अनेक वाद झाले. अनेकदा खेळाडूंना स्लेजिंग केल्यामुळे दंड भरावा लागला आहे. या सर्वांचा परिणाम संघावरदेखील होताना दिसला आहे. बऱ्याचदा संघाला सामने गमवावे लागले आहेत.
याव्यतिरिक्त अनेकदा खेळाडूंच्या अति-आत्मविश्वासाचा परिणाम संघाला भोगावा लागला आहे. अति आत्मविश्वासामुळे खेळाडूंनी असे काही कृत्य केले की, संघाला जिंकत आलेला सामना गमावावा लागला आहे. या लेखात, अशाच ५ प्रसंगांचा आढावा घेण्यात आला आहे. 5 Instances When The Overconfidence Of Cricketers Is Backfired
स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड
२०१५ सालची ऍशेस मालिका सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने असे वक्तव्य केले होते की, ज्याला ऐकून सर्वांनी त्याच्यावर टीका केली होती. त्याने ऍशेस मालिकेची सुरुवात होणाच्या एक दिवस आधी म्हटले होते की, इंग्लंड संघ माझ्या आसपासदेखील टिकू शकत नाही.
स्मिथने अति-आत्मविश्वासाने केलेले हे वक्तव्य त्याच्यावर भारी पडले होते. इंग्लंडने ३-२ च्या फरकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत, ऍशेस मालिका जिंकली होती. सुरुवातीला आपल्या वक्तव्यामुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना कराव्या लागणाऱ्या स्मिथवर पराभवानंतरही खूप टीका झाली होती. अनेकांनी तर असे म्हटले होते की, स्मिथ अति आत्मविश्वासाचा शिकार झाला होता, त्यामुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड
२०१६ साली दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सला अति आत्मविश्वामुळे तोंडघशी पडावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांविषयी विवादात्मक विधान केले होते. तो पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाला होता की, इंग्लंडमध्ये अनेक अनुभवी गोलंदाज आहेत, पण काही गोलंदाज चांगले प्रदर्शन करु शकत नाहीत.
डिविलियर्सने ते विधान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला निशाण्यावर धरत केले होते. पण, अँडरसनने पूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करत संघाला २-१ च्या फरकाने मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध न्यूझीलंड
२०१५ सालच्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ बऱ्याचदा आमने सामने आले होते. दरम्यान एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १५१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ९ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर अंतिम विकेट घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी उतरला होता.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने अति आत्मविश्वास दाखवत, दर्शकांना ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्याचा संकेत दिला. पण, फलंदाजी करत असलेल्या केन विलियम्सनने दमदार चौकार मारत न्यूझीलंडला एक विकेटने शानदार विजय मिळवून दिला होता.
अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) विरुद्ध भारत
२००७ सालचा टी२० विश्वचषक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय प्रसंगांपैकी एक आहे. अधिकतर दोन कारणासांठी या विश्वचषकाची आठवण काढली जाते. एक म्हणजे, भारताने हा विश्वचषक जिंकला होता, तर दूसरे म्हणजे, युवराज सिंगने याच विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूंवर सलग ६ षटकार मारले होते.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजने त्याच्या सलग ६ षटकारांमागचे रहस्य सांगितले होते. इंग्लंडचा क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफने भारताविरुद्धच्या त्या सामन्यात युवराजला असे काही म्हटले होते, ज्यामुळे तो रागात होता. युवराजने फ्लिंटॉफवरील त्याचा राग काढण्यासाठी मोठ-मोठे शॉट्स मारायला सुरुवात केली आणि सुदैवाने टी२० क्रिकेटमध्ये ६ चेंडूत सलग ६ षटकार मारण्याचा दमदार विक्रम घडला.
आमिर सोहेल (पाकिस्तान) विरुद्ध भारत
१९९६ साली विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ समोरासमोर आले होते. या सामन्यात नवज्योत सिंग सिद्धू याच्या ९३ धावा आणि अजय जडेजाच्या ४५ धावांच्या मदतीने भारताने पाकिस्तानविरुद्ध २८७ धावांचा डोंगर उभा केला होता. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात पाकिस्तानकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आमिर सोहेल आणि सईद अनवर आले होते. दोघांनीही मैदानाच्या चारही दिशांना मोठमोठे शॉट्स मारत दमदार सुरुवात केली होती.
याच दरम्यान आमिरने व्यंकटेश प्रसादच्या एका षटकात लागोपाट दोन चौकार लगावत त्याला बॅटने काहीसा इशारा केला होता. मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर व्यंकटेश प्रसादने आमिरचा त्रिफळा उडवला आणि आपल्या खास शैलीत त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता.
एवढेच नव्हे तर, भारताने तो सामना ३९ धावांच्या जिंकलादेखील होता आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
ट्रेंडिंग लेख-
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधारपद जाणार?, संघ मालकाने दिली प्रतिक्रिया
-आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात सचिनच्या संघावर ठरला होता धोनीचा संघ भारी