fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडियन क्रिकेट लीग अर्थात ‘वादग्रस्त आयसीएल’मुळे करियरचं मोठं नुकसान झालेले ५ क्रिकेटर

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

क्रिकेट जगतात सध्या टी२० क्रिकेटचा काळ सुरु आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा टी२० क्रिकेट प्रकार सुरु झाला, तेव्हा भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुभाष चंद्रा यांनी दिग्गज खेळाडूंसाठी इंडियन क्रिकेट लीग नावाने एक स्पर्धा सुरु केली होती.

इंडियन क्रिकेट लीग (Indian Cricket League) आल्यामुळे बीसीसीआय (BCCI) नाराज झाली होती. त्यामुळे त्यांनी या आयसीएलला मान्यता दिली नाही आणि या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली. असेच काही काळानंतर आयसीसी आणि इतर क्रिकेट बोर्डांनी आपापल्या खेळाडूंबरोबर केले होते.

ही लीग २००७ ते २००९ या काळात झाली. तेव्हा कपिल देव हे आयसीएलशी जोडलेले असल्याने बीसीसीआयने त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदावरुन काढले होते.

या लेखात आपण त्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळून आपल्या कारकीर्दीवर संकट ओढावून घेतले. एकेकाळी मुख्य खेळाडू समजले जाणारे दिग्गज नंतर आपल्या संघासाठी नियमितपणे खेळतानाही दिसले नाहीत.

इंडियन क्रिकेट लीगमुळे कारकीर्दीचे नुकसान झालेले ५ खेळाडू- 5 Players Indian Cricket League

५. अब्दुल रझाक

पाकिस्तान संघात जेव्हाही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंची चर्चा होते, तेव्हा त्यामध्ये इम्रान खाननंतर दुसऱ्या क्रमांकावर अब्दुल रझाकचे (Abdul Razzaq) नाव येते. अनेकवेळा रझाक आपल्या आक्रमक खेळीने सामना विजेत्याची भूमिका निभावताना दिसायचा.

रझाक दुखापतग्रस्त झाल्यामुळे २००७ सालच्या विश्वचषकात खेळला नव्हता. त्यानंतर त्याचवर्षी झालेल्या टी२० विश्वचषकातही तो संघाचा भाग नव्हता. त्यानंतर रागामध्ये येऊन त्याने इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

तरीही बंदी संपल्यानंतर रझाकने २००९मध्ये पाकिस्तान संघात पुनरागमन केले. परंतु तो पूर्वीप्रमाणे प्रभावीपणे खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने २०११मध्ये आपला शेवटचा वनडे सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. तसेच, टी२०मधील शेवटचा सामना २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. पुढे जाऊन त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

त्याने पाकिस्तानकडून खेळताना आतापर्यंत ४६ कसोटी, २६५ वनडे आणि ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १९४६, वनडेत ५०८० आणि टी२०त ३९३ धावा केल्या आहेत. तसेच, कसोटीत १००, वनडेत २६९ आणि टी२०त २० विकेट्सही घेतल्या आहेत.

४. मोहम्मद सामी

पाकिस्तानच्या मोहम्मद सामी (Mohammad Sami) या खेळाडूचे नावही या यादीत सामील आहे. त्याने जेव्हा आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्याकडे घातक गोलंदाज म्हणून पाहिले जात होते. तरी संघात नियमितपणे चांगली कामगिरी करण्यात तो अयशस्वी ठरला होता.

काही काळानंतर सामीने इंडियन क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) बंदी घातली. परंतु २००९मध्ये त्याला पुन्हा संघात सामील केले. परंतु त्याला पूर्वीसारखी चमकदार कामगिरी करता आली नाही.

सामी पाकिस्तान संघाकडून २०१६ टी२० विश्वचषकापर्यंत खेळला होता. परंतु तो कधीच नियमितपणे पाकिस्तान संघाचा भाग बनू शकला नाही. त्याच्यात इंडियन क्रिकेट लीगबरोबरच दुखापतीचाही खूप मोठा हात राहिला होता. त्यामुळे त्याला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही.

त्याने २००१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर ३६ कसोटी, ८७ वनडे आणि १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८५, वनडेत १२१ आणि टी२०त २१ विकेट्स घेतल्या आहेत.

३. जस्टिन केम्प

दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जस्टिन केम्पच्या (Justin Kemp) क्रिकेट कारकीर्दीलाही अशीच उतरती कळा लागली होती. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून सतत दक्षिण आफ्रिका संघाची पहिली पसंत राहिला होता. त्यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

केम्पनेदेखील पुढे जाऊन इंडियन क्रिकेट लीग खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्यावर क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. २००९मध्ये त्याच्यावर लावण्यात आलेली बंदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (South Africa Cricket Board) हटवली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

केम्प त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकला नाही. कारण एल्बी मॉर्केलला त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे केम्पची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.

त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना ४ कसोटी, ८५ वनडे आणि ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८०, वनडेत १५१२ आणि टी२०त २०३ धावा केल्या आहेत. तसेच, त्याने कसोटीत ९ आणि वनडेत ३२ विकेट्सही घेतल्या आहेत.

२. अफ्ताब अहमद

बांगलादेश संघात एकेकाळी खूप चांगले खेळाडू येत होते. ज्यामध्ये काही खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमतरता नव्हती. हे खेळाडू थोडी का होईना परंतु बांगलादेश संघासाठी चांगली कामगिरी करत होते. या यादीत अफ्ताब अहमदच्या (Aftab Ahmed) नावाचाही समावेश होता.

अहमद बांगलादेश संघासाठी खेळत होता. परंतु अचानक त्याने इंडियन क्रिकेट लीग खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. बोर्डाने त्याच्यावरील १० वर्षांची बंदी २००९मध्ये हटवली होती.

अहमदने संघात पुनरागमन केले होते. परंतु त्याच्यात पूर्वीसारखी असणारी धमक पहायला मिळाली नाही. त्याच्याबरोबर इतर प्रतिभावान खेळाडूही बांगलादेशमध्ये आले होते. अफ्ताबने आपला शेवटचा सामना २०१०मधील टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

त्याने बांगलादेशकडून खेळताना १६ कसोटी, ८५ वनडे आणि ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५८२, वनडेत १९५४ आणि टी२०त २२८ धावा केल्या आहेत.

१. शेन बॉण्ड

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज समजला जाणारा शेन बॉण्डचाही (Shane Bond) या यादीत समावेश आहे. आपल्या लहान कारकीर्दीत मोठ- मोठे कारनामे केल्यामुळे त्याचे नाव आजही दिग्गज खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्यानेही आपल्या कारकीर्दीच्या सर्वात चांगल्या काळात चूकीचा निर्णय घेतला.

बॉण्ड जेव्हा आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना चिंतेत टाकायचा, तेव्हा त्याने इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्यावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) बंदी घातली होती. काही वर्षांनी त्याने न्यूझीलंड संघात पुनरागमन केले होते.

परंतु पुनरागमन करूनही पूर्वीप्रमाणे चांगली कामगिरी त्याला करता आली नाही. त्यामुळे बॉण्डसारख्या दिग्गज खेळाडूची कारकीर्द फार काळ टिकली नाही. असे असले तरी आजही त्याचे नाव दिग्गज गोलंदाजांमध्ये घेतले जाते.

त्याने न्यूझीलंडकडून खेळताना १८ कसोटी सामने, ८२ वनडे सामने आणि २० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८७, वनडेत १४७ आणि टी२०त २५ विकेट्स घेतल्या आहेत.


Previous Post

हार्दिक पंड्याचा मुलगा झाला एक महिन्याचा, नताशाने शेअर केला खास फोटो

Next Post

हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार

Related Posts

Photo Courtesy: Instagram/@sakshisingh_r/@ziva-singh_dhoni
Covid19

धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली…

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Next Post

हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार

आयपीएलमध्ये कर्णधार तर अनेक झाले, पण यश मात्र या ५ जणांनाच मिळाले

आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.