fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या ३ कारणांमुळे असणार चौथ्या कसोटी सामन्यावर सर्वांचे लक्ष

आज आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकणारा आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. 

त्यात चेंडू छेडछाड प्रकरणामुळे हा संघ चांगलाच अडचणीत आला आहे. या पार्शभुमीवर हा कसोटी सामना सुरू होत असून अनेक कारणांमुळे क्रिकेटप्रेमी हा सामना कधीही विसरणार नाही. 

त्यातील ३ ठळक कारणे अशी- 

१. मोर्न मोर्कलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना- 

मोर्न मोर्कलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असून मालिका सुरु होण्यापुर्वीच त्याने याची घोषणा केली होती. या मालिकेत त्याने २ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. 

२. डॅरेन लेहमनचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना-

आॅस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक म्हणून गेली ५ वर्ष अफलातून कामगिरी केलेल्या डॅरेन लेहमनचा हा शेवटचा सामना आहे. त्याच्याच प्रशिक्षक पदाच्या काळात आॅस्ट्रेलिया संघाने संघाने २ अॅशेस आणि एक विश्वचषक जिंकला आहे.

३. टीम पेनचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना-

१२ कसोटी सामने खेळलेल्या टीम पेनचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. यष्टीरक्षक कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. अतिशय कठीण काळात हा खेळाडू ही जबाबदारी पार पाडत आहे. 

You might also like